ETV Bharat / city

Raza Academy Reaction : अमरावती, मालेगाव हिंसाचाराशी रझा अ‍ॅकेडमीचा संबंध नाही - सईद नुरी - मालेगाव हिंसाचार बातमी

महाराष्ट्रामध्ये उसळलेल्या दंगलीमुळे रझा अ‍ॅकेडमीवर(Raza Academy) टीका होत असून, ती चुकीची आहे. त्यामुळे अमरावती, मालेगाव हिंसाचाराचा(Amravati Malegaon Violence) रझा अ‍ॅकेडमीशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया रझा अ‍ॅकेडमीचे जनरल सेक्रेटरी सईद नुरी यांनी दिली.

Raza Academy
रझा अॅकेडमीचे जनरल सेक्रेटरी सईद नुरी
author img

By

Published : Nov 13, 2021, 5:11 PM IST

Updated : Nov 13, 2021, 6:47 PM IST

मुंबई - त्रिपुरा घटनेनंतर (Tripura Violence) महाराष्ट्रामध्ये उसळलेल्या दंगलीमुळे रझा अ‍ॅकेडमीवर(Raza Academy) टीका होत असून, ती चुकीची आहे. लोकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. हिंसक आंदोलनाला रझा अ‍ॅकेडमी कधीच पाठिंबा आणि समर्थन देत नाही. त्यामुळे अमरावती, मालेगाव हिंसाचाराचा(Amravati Malegaon Violence) रझा अ‍ॅकेडमीशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया रझा अ‍ॅकेडमीचे जनरल सेक्रेटरी सईद नुरी यांनी दिली आहे. या प्रकरणातील दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील नुरी यांनी केली आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

रझा अ‍ॅकेडमीला बदनाम करण्यासाठी हिंसक आंदोलन -

रझा अ‍ॅकेडमीला बदनाम करण्यासाठी हिंसक आंदोलन काही लोकांकडून करण्यात येत आहे. अशा लोकांचा राज्य सरकारने तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच राजकीय पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे आंदोलन घडवून आणतात, त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी सईद नुरी यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केली आहे.

अमरावती, मालेगावात तणाव -

अमरावतीत बंददरम्यान शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरात पुढील ४ दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी याची माहिती दिली. तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपवा पसरण्याची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati violence) शुक्रवारी काढलेल्या मोर्चा दरम्यान काही दुकानांची तोडफोड झाली. याच्या निषेधार्थ आज अमरावतीत बंद पुकारण्यात आला असून या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र शनिवारी बघायला मिळाले.

Last Updated : Nov 13, 2021, 6:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.