मुंबई - राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने फ्रांसच्या प्रसार माध्यमांमधून होत होता. त्या बातम्यांना आता दुजोरा मिळाला असून राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला 65 कोटी रुपये लाच दिली असल्याचे वृत्त फ्रांसमधून समोर येत आहे. ही गंभीर बाब असून याबाबत केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे. हळूहळू सर्व गोष्टी समोर येत असल्याने, केंद्र सरकारने त्वरित याबाबत चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत.
काश्मीरची स्थिती अद्यापही सुधारलेली नाही
गेल्या दोन वर्षापासून जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. मात्र, अद्यापही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः या सर्व भागाचा दौरा करत आहेत. मात्र, तरीही परिस्थिती बदलण्याचा नाव घेत नाही. आताही निरपराध लोकांना मारले जात आहे. दहशतवाद थांबलेला नाही. याचा अर्थ काश्मीरच्या मुद्द्यावर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झाला असल्याची टीका नवाब मलिक त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
मालिकांचं सूचक ट्विट
ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांच्याकडून आरोप झाल्यानंतर, दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडणार असल्याचे संकेत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी बारा वाजता देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषद ठेवून देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत आपल्या विरोधकांना इशारा दिला आहे.
हेही वाचा - जगण्याच्या संघर्षात पिण्याचे पाणीही मिळत नाही असे 'हे' गाव! पहा ईटीव्ही भारतचा एक रिपोर्ट