मुंबई - कांदिवलीतील एका सहा वर्षीय मुलीवर 19 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून चंदन साहू असे या आरोपीचे नाव आहे. तो एका हॉटेलमंध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो.
आरोपी मुळचा झारखंडचा -
मंगळवारी आरोपी पीडित मुलगी ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी चंदनने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीच्या घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी आरोपीला एका हॉटेलमधून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा आरोपी झारखंडचा रहिवासी असून तो ज्या हॉटेलमध्ये काम करत असे आणि त्याच हॉटेलमध्ये राहत होता.