मुंबई - मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणी वसूली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायिक गुरुचारणसिंह चौहान यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू, अशी धमकी देत 17 लाखाची खंडणी वसूल केली आहे. मात्र, अजून पैसे दिले नसल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिसांत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदार गुरुचरणसिंह चौहान यांनी पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक सुनील माने (वाझे प्रकरणात सुनील माने बडतर्फ आहेत.) तसेच पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. तिघांविरोधात भा.दं.वि.चे कलम 385, 167, 466, 471, 474, 323, 504, 201, 506 (2), 120 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.
हेही वाचा - संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा सोडून मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग