ETV Bharat / city

Disha Salian : राणे पिता- पुत्रांना पोलीस कोठडी देण्याची मागणी.. मात्र, न्यायालयाने १५ मार्चपर्यंत.. - नारायण राणे नितेश राणे जामीन अर्ज

नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली ( Narayan Rane Nitesh Rane Bail Application ) आहे. या अर्जावर आज न्यायालया सुनावणी करण्यात आली. त्यावेळी मालवणी पोलिसांकडून राणे पिता-पुत्रांच्या चौकशीकरिता कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दिंडोशी न्यायालयाने ( Dindoshi Sessions Court ) राणे पिता- पुत्रांवर 15 मार्चपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

राणे पिता- पुत्रांना पोलीस कोठडी देण्याची मागणी

author img

By

Published : Mar 10, 2022, 6:21 PM IST

मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात दिशा सालियनच्या आईने तक्रार दाखल केली ( Disha Salian Case ) आहे. या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी चौकशी करण्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी राणे पिता पुत्रांना नोटीस बजावली होती. मात्र नारायण राणे यांनी चौकशीला उपस्थित राहण्याकरिता अधिक वेळ मागून घेतला. त्यानंतर नारायण राणे आणि मुलगा नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली ( Narayan Rane Nitesh Rane Bail Application ) आहे. या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्यावेळी मालवणी पोलिसांकडून राणे पिता-पुत्रांच्या चौकशीकरिता कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. दिंडोशी न्यायालयाने ( Dindoshi Sessions Court ) राणे पिता- पुत्रांवर 15 मार्चपर्यंत कुठलीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार

दिशा सालियनची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी अशी विनंती सालियान कुटुंबियांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रिय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टिका करत होते. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली. ती गरोदर होती, असा नारायण राणेंचा दावा होता. राणे पिता- पुत्रांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून, मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.

तक्रार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे

मृत्यूपश्चात देखील होत असलेल्या आपल्या मुलीच्या बदनामीमुळे व्यथित झालेल्या दिशाच्या आई वडिलांनी या संदर्भात दिशाच्या मृत्यूबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती देणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करावी. तसेच दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली. यानंतर राज्य महिला आयोगाने याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यवाही अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

राणे पिता-पुत्रांची पोलिसांना पाहिजे कोठडी

मालवणी पोलीस स्टेशनमध्ये सालियनच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार राणे पिता-पुत्रांची 4 तास चौकशी करण्यात आली. मात्र, राणे यांच्याकडून कुठलीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. राणे पितापुत्रांनी कोणत्या आधारावर आरोप केले आहेत, त्यांच्याकडे काय सबळ पुरावे आहेत ते सादर करण्याचे सांगितल्यानंतर देखील त्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत. राणे पिता-पुत्र चौकशीला सहकार्य करत नसल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या सर्व प्रकरणाची माहिती घेण्याकरिता राणे पिता-पुत्रांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची माहिती पोलिसांकडून आज दिंडोशी सत्र न्यायालयात देण्यात आली आहे.

राणेंचं नेमकं ट्वीट काय?

याप्रकरणी नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच. सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार? असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं.

काय आहे प्रकरण?

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होती. तसेच दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याचीही चौकशी केली जात होती. त्याशिवाय दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यानतंर याप्रकरणाची मालवणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास बंद करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी पोलिसांनी तपास पूर्ण केला होता. नुकतंच पोलिसांकडून याबाबतचा रिपोर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही. तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना आढळलेले नाही असे नमूद करण्यात आले आहे होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.