मुंबई - शरद पवार यांच्यावर 31 मार्चला ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, 30 एप्रिलला अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांकडून मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस अनेक नेते मंडळींकडून केली जाते आहे.
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रासामुळे पोटात दुखू लागल्याने मंगळवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी रात्री रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली शरद पवार यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात हजेरी लावली तर काही नेते मंडळी मंडळींनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे.
आज सकाळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. खासदार नारायण राणे त्यांच्या पत्नी आणि नितेश राणे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर भेट घेऊन आल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून अजून एक शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवारयांच्यावर होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शरद पवार यांच्यावर 31 मार्चला रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार होती. मात्र मंगळवारी त्यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळे, अजित पवार, राजेश टोपे आणि रोहित पवार हेदेखील रुग्णालयात उपस्थित होते. शास्त्रक्रिये नंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करून सांगण्यात आले. गॉल ब्लॉडरमधील स्टोन काढण्याची शस्रक्रिया मंगळवारी पार पडली असून, शास्त्रक्रियेनंतर शरद पवार यांच्या पोटाला सूज आल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच गॉल ब्लॅडरची अजून एक शस्रक्रिया दोन ते तीन दिवसांनी पार पड़ेल अशी माहीतीही रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल मधील व्यवस्थापन तसेच डॉक्टरांचे आभार मानले आहेत.