ETV Bharat / city

Rana couple : राणा दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी जेल की जामीन? आज बांद्रा कोर्टात हजर करणार - बांद्रा कोर्ट नवनीत राणा

राणा दाम्पत्याला ( Navneet rana news Mumbai ) चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा ( Rana couple to appear in Bandra court ) दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुंबईतील बांद्रा ( Navneet rana to appear in mumbai court ) महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राणा दाम्पत्यांना जामीन मिळतो की जेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Navneet rana to appear in mumbai court
हनुमान चालीस प्रकरण नवनीत राणा मुंबई
author img

By

Published : Apr 24, 2022, 9:04 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणार, अशी घोषणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet rana news Mumbai ) आणि आमदार रवी राणा ( Rana couple to appear in Bandra court ) यांनी केल्याने शिवसेना विरुद्ध राणा असा सामना रंगला होता. या प्रकरणात राणा दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून शनिवारी अटक करण्यात आली. राणा दाम्पत्याची शनिवारची रात्र जेलमध्येच गेली. त्यांना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुंबईतील बांद्रा ( Navneet rana to appear in mumbai court ) महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. राणा दाम्पत्यांना जामीन मिळतो की जेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांचे भारतात आगमन

मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य केल्याप्रकरणी राणांना अटक करण्यात आली आहे. आज राणा दाम्पत्याला बांद्रा कोर्टात हजर केले जाणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे. एखादे प्रक्षोभक वक्तव्य करून जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जात असेल तेव्हा हे कलम लावले जाते. या गुन्ह्यामध्ये पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार नसल्याने आरोपीला न्यायालयासमोर हजर करावे लागते. पोलीस कोठडी हवी असल्यास तशी मागणी पोलीस करू शकतात.

दरम्यान एकीकडे राणा दाम्पत्याला खार पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्यानंतर दुसरीकडे राणा दाम्पत्याने उलट तक्रार नोंदवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि परीवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. या शिवाय घरावर हल्ला केल्याचा आरोप करत शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतांनी शिवसैनिकांना चिथवल्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी जिवे मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे, आता खार पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबईत येऊन मातोश्री बंगल्यावर हनुमान चालिसा पठण करणार, असा निर्धार राणा दाम्पत्याने केला होता. त्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही गनिमी काव्याने मुंबईत आले होते. काल दिवसभरात ते आपल्या घरातून बाहेर पडू शकले नाहीत. मुंबईत मातोश्री बंगला परिसर आणि नवनीत राणा यांचे निवासस्थान असलेल्या खारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा झाला. शिवसैनिकांनी गर्दी करत खडा पहारा दिला. नवनीत कौर आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणचा निर्धार केला होता. शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांच्या खारमधील घरासमोरही जोरदार घोषणाबाजी झाली आणि संध्याकाळनंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली. हे सगळे घडत असतनाच भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, ज्यामुळे राज्यात नवा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, तसेच अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे. तसेच, अज्ञात अशा 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मारहाण करून हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी शिवसैनिकांनी रुग्णवाहिका आणली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Attack Kirit Somaiya Car : किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.