ETV Bharat / city

Rana Couple : राणा दाम्पत्याला माध्यमांशी संवाद महागात पडण्याची शक्यता; जामीन रद्दसाठी महाराष्ट्र सरकार कोर्टात जाणार - rana couple latest news

नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी संवाद साधला ( Rana Couple Spoken Media ) आहे. त्यामुळे आता सत्र न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लघंन केल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार का?, या चर्चेला उधाण आले ( Rana Couple Cancelled Bail ) आहे.

Rana Couple
Rana Couple
author img

By

Published : May 8, 2022, 3:27 PM IST

Updated : May 8, 2022, 5:03 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तेव्हा न्यायालयाने त्यांना काही अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. त्यामध्ये माध्यमांशी बोलण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र, आज ( 8 मे ) नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्यानी माध्यमांशी संवाद साधला ( Rana Couple Spoken Media ) आहे. त्यावेळी नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सत्र न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लघंन केल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार का?, या चर्चेला उधाण आले ( Rana Couple Cancelled Bail ) आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर आता राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यात आक्षेपार्ह बाब आढळली तर त्यांचा जामीन अर्ज रद्द होऊ शकतो. शिवसेना याच प्रकरणी आता न्यायालयातही जाण्याच्या विचारात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

सरकारी वकील प्रतिक्रिया देताना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणांना 23 एप्रिल रोजी अटक केली होती. 13 दिवसानंतर मुंबई सत्र न्यायालयातून राणा दाम्पत्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर नवनीत राणांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

काय आहे न्यायालयाच्या अटी?

  • माध्यमांशी बोलण्यास मज्जाव.
  • दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपये भरावे लागणार.
  • पुराव्याशी छेडछाड केल्यास जामीन रद्द.
  • ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली, ती कृती ते परत करू शकणार नाहीत.
  • तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावे लागेल. तपास अधिकाऱ्यालाही 24 तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा - Navneet Rana challenges CM : नवनीत राणांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; कुठुनही निवडणुक लढवुन दाखवा !

Last Updated : May 8, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.