मुंबई - खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या अर्जावर मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने उत्तर सादर करण्याचे निर्देश राणा दाम्पत्यांना दिले होते. आज राणा दाम्पत्यांच्या वकिलांकडून उत्तर सादर ( Rana couple reply in court ) केले आहे. आता या याचिकेवर पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे. राणा दांपत्य यांचा जामीन रद्द होतो की दिलासा मिळतो हे पुढील सुनावणीला स्पष्ट होणार आहे.
राणा दाम्पत्यांचे वकीलाचे न्यायालयात उत्तर - न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींचे राणा दाम्पत्यांनी उल्लघंन केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे. या प्रकरणी राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी त्यांच्यावतीने आज न्यायालयात उत्तर दिले आहे. राणा दाम्पत्याकडून न्यायालयाने घातलेल्या कोणत्याही अटींचे उल्लघंन केले नाही असे त्यांचे वकील मर्चंट न्यायालयात उत्तर दिले आहे. फक्त माध्यमांशी बोलताना न्यायालयाच्या अटींचे उल्लघंन होत नाही. आणि माध्यमांशी बोलताना काय बोलले हे देखील तितकेच महत्वाचे आहे. माध्यमांशी बोलताना राणा दाम्पत्यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे. पोलिसांनी ज्या घटनेसाठी राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाची वाचत्या आणि कुठल्याचे विधान केलेले नाही. त्यामुळे न्यायालयाचे अटी शर्तींचे उल्लघंन झाल्याचा प्रश्नच येत नाही असे उत्तर राणा दाम्पत्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले.
युक्तीवादासाठी पुढील तारीख - सध्या राणा दाम्पत्य हे महत्वाच्या कामासाठी राज्याबाहेर गेले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य हे आज न्यायालयात येवू शकले नाही. परंतु राणा दाम्पत्य हे पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्यासाठी ते पुर्ण प्रयत्न करतील असे त्यांचे वकिलांनी न्यायालयात उत्तर देताना सांगितले. राणा दाम्पत्यांचे वकील पुढील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कलम 124(अ) तुर्तास स्थगित केला आहे. प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या केसमध्ये इतर सेक्शन सुद्धा असल्यामुळे आरोपींनी अटी शर्तींचा जे उल्लघंन केले आहे. यासंदर्भात राणा दाम्पत्यांना लावलेले जे कलमांचा 124(अ) काही संबंध नाही. त्यावर युक्तीवाद करण्यासाठी न्यायालयासमोर प्रार्थना केली. कारण नोटीस जरी लागली तरी आरोपींचे वकील आज न्यायालयात हजर होते. त्यामुळे न्यायालयात सांगितले की, युक्तीवाद ऐकण्यास काही हरकत नाही. परंतु, न्यायालयाने त्यांची वस्तुस्थिती नोंद करून घेऊन आता युक्तीवादासाठी पुढची तारीख दिली आहे.
काय आहे न्यायालयाच्या अटी?
- माध्यमांशी बोलण्यास मज्जाव.
- दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपये भरावे लागणार.
- पुराव्याशी छेडछाड केल्यास जामीन रद्द.
- ज्या कारणामुळे त्यांना अटक झाली ती कृती ते परत करू शकत नाहीत.
- तपास करणारा अधिकारी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवेल तेव्हा हजर राहावं लागेल. तपास अधिकाऱ्यालाही 24 तास आधी राणा दाम्पत्याला नोटीस देणं बंधनकारक आहे.
काय आहे प्रकरण - सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटातील नागरीक गढूळ पाण्याने त्रस्त; खासदार मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात व्यस्त