मुंबई - महाविकास आघाडी विरोधकांना विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गुल आहे की त्यांना भान राहिलेले नाही, के ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतात? सरकारने बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका आहे. त्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
उद्या 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र् बंद पुकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी राज्यात सरकार चालविणारे महाराष्ट्र् बंद कसा पुकारू शकतात, असा सवाल केला आहे.
लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. लखीमपूर खेरीतील प्रकार दुःखद आणि मनाला चटका लावणारा आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी एस आय टी मार्फत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई निश्चित होईल. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांचे नेते नवीन कृषी कायद्यांबबत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना हवे ते बदल करण्यास तयार आहेत. मात्र, कायदेच रद्द करा आधी आडमुठी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायद्यांबाबत सुचनांचे स्वागत करून कायद्यात सुधारणा करण्यास तयार आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्वच प्रश्न आंदोलन करून सोडवताना काही प्रश्न चर्चा करून ही सोडविले पाहिजेत. लोकशाहीत आंदोलन करणे योग्य, मात्र शेतकरी नेते ज्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. तो आंदोलनाचा अतिरेक आहे, असे आठवले म्हणाले.
हेही वाचा - ASHISH MISHRA ARREST युपी पोलिसांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक