मुंबई: राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala भारतीय शेअर बाजाराचा बादशहा King of Indian stock market म्हणून ओळखले जातात. मुंबईच्या बीच कॅन्डी रुग्णालयात Beach Candy Hospital निधन झाले. १९८५ मध्ये शेअर बाजारात पाऊल ठेवलेल्या झुनझुनवाला यांनी अल्पावधीच नावारुपाला आले. प्रसिध्द उद्योगपती म्हणून ही प्रचलित होते. देशातील सुमारे १०० गर्भ श्रीमंतांमध्ये झुनझुनवाला यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याकडे किंमती आणि दिमाखदार महागड्या गाड्यांचे कलेक्शन होते.
बीएमडब्ल्यू एक्स BMW X झुनझुनवालांकडील कारच्या यादीत बीएमडब्ल्यूची लक्झरी स्पोर्ट एसयूव्ही एक्स ५ ही कार पहिल्या क्रमांकावर आहे या कारमध्ये २९९३ सीसी ६ सिलेंडर डिझेल इंजिन असून ४ हजार आरपीएम, २६५ एचपी पॉवर आणि दीडशे ते अडीच हजार आरपीएमवर ६२० एनएम टॉर्क निर्माण करते कारमध्ये ८ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स वापरला आहे बीएमडब्ल्यू एक्स ५ चा कमाल वेग २३० किलोमीटर असून त्याची किंमत ८५ लाख रुपये इतकी आहे
ऑडी क्यू ७ Audi Q7 राकेश झुनझुनवाला कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फुल साइज एसयूव्ही ऑडी क्यू -७ आहे. या गाडीची किंमत एक कोटी रुपये आहे. याचा सर्वाधिक वेग २१० किमी प्रतितास असून ५.९ सेकंदात शून्य ते शंभर किमी प्रति तास वेग वाढवू शकतो. या कारमध्ये २९६७ सीसीव्ही-६ डिझेल इंजिन आहे. ४५०० आरपीएमवर २४९ पीएस पॉवर आणि दीड हजार, तीन हजार आरपीएमवर सहाशे एनएम टॉर्क निर्माण करते.
मर्सिडीज मेबॅक एस क्लास Mercedes Maybach S Classमर्सिडीज मेबॅक एस- ६०० ही राकेश झुनझुनवाला यांच्याकडील तिसऱ्या क्रमांकाची कार आहे. सुमारे अडीच कोटी रुपये कारची किंमत आहे. कारचा टॉप स्पीड असून २५ किमी तास आहे. पाच मिनिटात शून्य - शंभर किमी, ताशी वेग पकडू शकते. कारमध्ये ५९८० सीसी व्ही -१२ प्रकारचे पेट्रोल इंजिन आहे. जे ४९००- ५३०० आरपीएम वर ५३० बीएचपी पॉवर आणि १९०० - ४००० आरपीएम ८३० एनएम टॉर्क निर्माण करते.