मुंबई - खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर रिकाम्या झालेल्या एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहिले. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रजनी पाटील यांचा विजय नक्की असल्याचा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींचा गुदमरून मृत्यू; शवविच्छेदन अहवालात समोर
बिनविरोध निवडणुकीसाठी करणार प्रयत्न-
महसूल विकास मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की महाविकास आघाडीचे उमेदवार रजनी पाटील यांच्या विजयासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र राजीव सातव यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेनुसार दुर्देवाने एखाद्या आमदार किंवा खासदार याचा मृत्यू झाल्यास त्या जागी निवडणूक बिनविरोध होत असते. त्यामुळे ही निवडणूकदेखील बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षासोबत चर्चा करणार असल्याचे यावेळी महसूल मंत्रीथोरात यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असावा, हे पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवत असतात. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील निवड केली असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा-बर्गरमध्ये आढळला विंचू; अर्धा भाग खाल्ल्यानंतर तरुणाची तब्येत बिघडली
निवडणूक जिंकण्यासाठी आघाडीकडे पुरेसे संख्याबळ
राज्यसभेच्या जागेसाठी असलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रजनी पाटील यांचा विजय निश्चित आहे. निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडावी यासाठी महाविकासआघाडी प्रयत्न करेल, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी बदलावी लागणार, रजनी पाटील यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी