ETV Bharat / city

कोरोना उपचाराच्या जाहिराती कराल तर खबरदार..! - राजेद्र शिंगणे - News about Minister Rajendra Shingane

संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रसार होत आहे. यातच उपचाराबाबत चित्र-विचित्र जाहिराती करून कोरोना बरा होत असल्याचा दावा केल्यास त्यांच्या विरुद्ध कारावाई केली जाईल, असा इशारा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

author img

By

Published : Mar 19, 2020, 12:48 PM IST

मुंबई - संपूर्ण जगभरात कोरोना विळखा घातला असताना भारतीय समाज माध्यमांमध्ये कोरोना उपचाराबाबत चित्रविचित्र जाहिराती करून कोरोना बरा करण्याचा दावा केला जात आहे. कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करत असताना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनापासून प्रादूर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

कोणत्याही उत्पादकाने कोरोनावर औषध, उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई -

कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवने, जनतेची दिशाभूल करणे या प्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिहंत मॅट्रेसेसच्या मालकांनी दि. 13 मार्चला एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात ‘अरिहंत अ‌ॅन्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’ या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली. त्याद्वारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असा खोटा दावा करीन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली. या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 सह औषधीद्रव्य व जादुटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम 1954 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशिष्ट आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यास कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी रोग प्रतिरोधक औषधे, अशा आशयाचा मजकूर असलेली आक्षेपार्ह मजकूर असलेली जाहिरात प्रकाशित करून वितरित केही होती. याबद्दल दि. १६ मार्चला अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई येथील मुलुंड पोलीस ठाण्यात शितल आयुर्वेद भांडार प्रा. लि. या कंपनीवर गुन्हा औषधे व जादुटोणा कायदा 1954 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांतर्गत सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.