ETV Bharat / city

राज ठाकरे तीन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर, ममता बॅनर्जींची घेणार भेट

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. आता राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात वातावरण तापवणार असल्याचे बोलले जात आहे.

raj thackeray will meet mamata banerjee in Calcutta
author img

By

Published : Jul 30, 2019, 10:01 AM IST

Updated : Jul 30, 2019, 10:11 AM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात, राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची 31 जुलै रोजी भेट घेणार आहेत. तर 1 ऑगस्टला राज ठाकरे मुंबईत परतील. ईव्हीएम विरोधातील आंदोलन तीव्र करण्यासाठी ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व विरोधकांनी टीका केली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. आता राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात वातावरण तापवणार असल्याचे बोलले जात आहे.

ईव्हीएम विरोधात राज ठाकरे सर्व विरोधी पक्ष अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे समजते. नवी दिल्लीत राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यासोबतच काल राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष सुरू असताना, राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत राज ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता.

Intro:मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवार 30 जुलैपासून तीन दिवसीय कलकत्ता दौऱ्यावर असणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची राज ठाकरे हे 31 जुलै रोजी भेट घेणार आहेत. तर 1 ऑगस्टला राज ठाकरे मुंबईत परतील. ईव्हीएम विरोधातील आंदोलन तीव्र करण्यासाठी ही भेट असणार असल्याचे बोलले जातेय.Body:लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व विरोधकांनी टीका केली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएम वर प्रश्न चिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. आता राज ठाकरे ईव्हीएम विरोधात ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात वातावरण तापवणार आहेत.
ईव्हीएमविरोधात राज ठाकरे सर्व विरोधी पक्ष अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे समजते. नवी दिल्लीत राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आज राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मुंबईत आल्यावर राज ठाकरे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतील.Conclusion: पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष सुरू असताना राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाई बाबत राज ठाकरेंनी ममता बनर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता.
Last Updated : Jul 30, 2019, 10:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.