मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray Write Letter To Devendra Fadnavis For Remove Candidate From Andheri By-Election यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपने आपला उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर अखेर भाजपने BJP Removed Candidate From Andheri By election आपले अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे MNS Chief Raj Thackeray यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या पत्राचा मान राखून उमेदवार मागे घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरे Raj Thackeray Said Thanks To Devendra Fadnavis यांनी आभार मानले आहेत.
राज ठाकरे यांनी काय लिहले आहे पत्रात भाजपने उमेदवारी मागे घेतल्यानंतर राज ठाकरे MNS Chief Raj Thackeray यांनी आभार मानण्यासाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र ! काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार Bjp Candidate For Andheri By-Election उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार."
ही संस्कृती समाजासाठी आवश्यक आपल्या पत्रात राज ठाकरे पुढे लिहितात की, "चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी, असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार. आपला मित्र, राज ठाकरे"
ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Bjp State President Chandrashekhar Bawankule यांनी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्ष आपला उमेदवार मागे घेणार असल्याची घोषणा केली. भाजपने मुरजी पटेल Bjp Candidate Muraji Patel यांना येथून उमेदवार घोषित केले होते. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोषणेनंतर आता मुरजी पटेल उमेदवारी मागे घेणार आहेत. अशा स्थितीत भाजपच्या या निर्णयानंतर आता ऋतुजा लटके Rutuja Latke यांचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.