मुंबई - भारतीय समूह वेदांत आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील दिग्गज फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले एफएबी उत्पादन कंपनी स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारसोबत सामंजस्य ( Vedanta Foxconn project in Gujarat ) करार केला आहे. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray reaction on Vedanta project ) केली आहे.
प्रकल्प निसटलाच कसा? आपल्या पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा प्रश्न राज ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला केला आहे.
सखोल चौकशी व्हायलाच हवी आपलं पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणतात की, हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचे ( probe of Vedanta Foxconn project ) राज्य होते. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरू होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या विषयाकडे बघायला हवे, असे म्हणत राज ठाकरे यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर, शिंदे फडणवीस सरकारशी सातत्याने जवळीक साधणारे राज ठाकरे यांनी अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय आहे प्रकल्प? या वर्षी जुलैमध्ये फॉक्सकॉन आणि वेदांत समूह यांच्यात एक करार झाला होता. ज्याअंतर्गत दोन्ही कंपन्या महाराष्ट्रात एकत्रितपणे 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार होत्या. वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन पुण्यातील सनराईज सेमीकंडक्टर चिप आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात काम करतील. या वर्षाच्या सुरुवातीला, वेदांता ग्रुपने फॉक्सकॉनसोबत आणखी एक करार केला आहे. या अंतर्गत ते पुढील 10 वर्षांमध्ये भारतात सेमीकंडक्टर चिप्स आणि डिस्प्लेच्या निर्मितीमध्ये $15 अब्जची गुंतवणूक करणार आहेत.
आदित्य ठाकरेंनीही शिंदे सरकारवर साधला निशाणा ( Aditya Thackeray on Vedanta Foxconn project ) प्रकल्प महाराष्ट्रात प्रस्तावित असताना इतका मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलाच कसा? असा प्रश्न शिवसेनेचे नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकार महाराष्ट्रातून उद्योग गुजरातमध्ये नेत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत केला आहे.