मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांना मंगळवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.
कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नाही - यासंदर्भात फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सचिन मोरे यांनी म्हटलंय की, "शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही चाचण्या करण्यात येतात यात राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एक जूनला होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे."
दुखण्यामुळे अयोध्या दौरा रद्द - काही दिवसांपूर्वीच या महिन्याच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी गुडघा आणि पाठीचा त्रास दूर करण्यासाठी हिप बोनची शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांनी अलीकडेच मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देऊन चर्चेत आले होते. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार होते, मात्र याच आजारपणामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला होता.
राज ठाकरे यांना हिप बोनचा आजार - अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यात एक सभा घेतली. या सभेत त्यांनी आपल्याला पायाचा नेमका कोणता आजार झाला आहे हे सांगितलं होतं. राज ठाकरे म्हणाले होते, "मागच्या वेळी असाच काहीतरी कामासाठी मी पुण्यात येत होतो. अचानक वाटेत माझ्या पायाच दुखणं सुरू झालं. या वेदना खूपच जास्त असल्याने मी परत मुंबईत परतलो आणि काही टेस्ट करून घेतल्या. त्यावर डॉक्टरांनी हिप बोनच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला."
दोन महिने सक्तीची रजा - राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना सुमारे दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. त्यामुळे मनसेचा अयोध्या दौरा आणि मशिदींवरून सुरू असलेले आंदोलन शांत होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील सभेत आपल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली होती. दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 711 नवे रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात 366 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, आजची हिपबोन शस्त्रक्रिया पुढे ढकलली - Raj Thackeray corona positive
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मंगळवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे डॉक्टरांच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. या संदर्भातील माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.