ETV Bharat / city

BMC Election 2022 : आगामी बीएमसी निवडणूकीसाठी राज ठाकरे मैदानात - संदीप देशपांडे

आगामी बीएमसी निवडणूक २०२२ ( BMC Election 2022 ) च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तयारी सुरू केली आहे. मनसे निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विधानसभेच्या विविध क्षेत्रांनुसार स्वत: राज ठाकरे आढावा घेणार आहेत. त्याची सुरुवात ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने होणार आहे.

BMC Election 2022
बीएमसी निवडणूक
author img

By

Published : Jul 19, 2022, 5:40 PM IST

मुंबई : आगामी बीएमसी निवडणूक २०२२ (BMC Election 2022) च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तयारी सुरू केली आहे. मनसे निवडणुकीची जोरदार तयारी करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विधानसभेच्या विविध क्षेत्रांनुसार स्वत: राज ठाकरे आढावा घेणार आहेत. त्याची सुरुवात ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने होणार आहे. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पक्षाची स्थिती, स्थानिक परिस्थिती आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले पदाधिकारी त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

संदिप देशपांडे यांची प्रतिक्रिया

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका : या संदर्भात माहिती देताना मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, "ईशान्य मुंबईत एकूण सहा विभाग आहेत. या सहा विभागांचे विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आणि अन्य जे काही पदाधिकारी आहेत. त्या सर्वांची बैठक आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बोलवली आहे. या बैठका पुढच्या आठवडाभर चालतील. या आठवड्याभरात मुंबईत जेवढे काही विभाग आहेत, त्या विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या अगदी शाखाप्रमुख, शाखा अध्यक्ष, इत्यादी तळागाळातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका स्वतः राज ठाकरे घेतील. या सर्व बैठका आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने घेण्यात येत आहेत."

आम्ही आमची तयारी करतोय : मनसेची आत्तापर्यंतची भूमिका एकला चलो रे अशी राहिली आहे. म्हणजेच जे काही करायचं ते स्वबळावर अशी मनसेची रणनीती राहिली आहे. मात्र सध्या भाजप व मनसेची वाढलेली जवळीक पाहता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन पक्षांची युती होणार का? असा प्रश्न विचारला असता, याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, "सध्या तरी या युती संदर्भातली कोणतीही चर्चा नाहीये. आणि आत्ताच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील या संदर्भात देखील कुठलीही चर्चा नाही. आम्ही आमच्या परीने जी काही तयारी करायला पाहीजे ती तयारी करत आहोत आणि याच्यापुढे जे काही निर्णय घ्यायचे ते स्वतः राज ठाकरे घेतील. "अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे ( Sandip Deshpande) यांनी दिली आहे.

दरम्यान, एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत आहे. शिवतीर्थावर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका मनसे आणि भाजप एकत्र लढणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे त्या त्या विभागातील पदाधिकाऱ्यांची चाचपणी आणि त्यांच त्यांच्या प्रभागातील काम तपासत असल्याची माहिती मिळते.

हेही वाचा : Uday Samant supporters : उदय सामंत समर्थकांना पदावरून हटवले; सामंत यांच्या दौऱ्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.