मुंबई - अयोध्या दौरा हा आपल्यासाठी लावण्यात आलेला ट्रॅप होता. या ट्रॅपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अडकू नये याची आपण काळजी घेतली आहे, असा आरोप नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Sachin sawant on Raj Thackeray rally pune ) यांनी आज पुण्याच्या सभेत केला. यावर राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यासाठी ट्रॅप ( Sachin sawant on Raj Thackeray Ayodhya tour trap ) हा भारतीय जनता पक्षाने चालवला होता, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
हेही वाचा - Jumbo Covid Centers Mumbai : मुंबईतल्या जम्बो कोविड सेंटरमधील साहित्य महापालिकेच्या इतर रुग्णालयांना देणार
राज ठाकरे आयोध्या दौऱ्याला गेले असते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असते. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे, भाजपच्या राज्य सरकारनेच मनसेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले असते. तसेच राज ठाकरे हे अयोध्याला येऊ नये यासाठी देखील आंदोलन करणारे हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातून राज ठाकरे यांच्याविरोधात रसद पुरवणारा पक्ष भाजपच असू शकतो, असा थेट आरोप सचिन सावंत यांनी आज केला.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आपल्या भाषणातून समोर आणल्यानंतर हिंदुत्वाच्या वोट बँकमध्ये नवीन वाटेकरी तयार होत असल्याचे भाजपच्या लक्षात आले. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभे आधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने तेथून काढता पाय घेतला. तसेच, उत्तर भारतीयांच्या मतांवर प्रभाव टाकण्यासाठी मनसेची नामुष्की करण्यात आली. हे कुटील कारस्थान केवळ भारतीय जनता पक्षाने केला असल्याचा दावा सचिन सावंत यांनी केला.
हेही वाचा - रविवारचा खरेदीचा दिवस.. पाहुयात आज कसे आहेत सोने, चांदी, बिटकॉइन आणि रुपयाचे दर..