ETV Bharat / city

राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल - मनसेप्रमुख राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील चार दिवस ते रुग्णालयामध्येच असणार आहेत. त्यांना पाठीचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : Apr 10, 2021, 6:20 PM IST

Updated : Apr 10, 2021, 10:10 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील चार दिवस ते रुग्णालयामध्येच असणार आहेत. त्यांना पाठीचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र ते रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना दुखापतीचा त्रास होऊ लागल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

टेनिस खेळताना झाली होती दुखापत

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या हाताला टेनिस खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अनेक दिवसांपासून त्यांच्या हाताल बॅंडेज होतं. दरम्यान त्रास जास्त वाढल्याने त्यांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - वाझे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - रामदास आठवले

Last Updated : Apr 10, 2021, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.