मुंबई - तब्बल तीन वेळा पुढे ढकलले राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं प्रस्तावित कामकाज वेळापत्रक राज्य सरकारकडून अखेर जाहीर करण्यात आलं. येत्या ७ सप्टेंबरपासून हे अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनचे नियम लागू असल्यामुळे याआधी दोन वेळा विधिमंडळ अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
आता तिसऱ्यांदा अधिवेशनाचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यामध्ये कामकाजाचं प्रस्तावित वेळापत्रक देण्यात आलं आहे. ७ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत अशा १४ दिवसांचा कार्यक्रम या वेळापत्रकात देण्यात आला आहे.
अधिवेशन किती मंडळ सभागृहात घ्यायचे की सभा घराबाहेर याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार बैठकीमध्ये हा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.