मुंबई : राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 48 जणांनी जीव गमावला आहे. पावसादरम्यान पुणे विभागातील 29 जणांचा मृत्यु झाला आहे. कोकण विभागातील 3 तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील उत्तर भागातील जिल्ह्यातही पावसाने थैमान घातलंय. काही भागात तर एका महिन्यात तीन वेळा पूरस्थितीचा सामना करावा लागला आहे.
-
Spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray Ji regarding the situation arising due to flooding and heavy rain in parts of the state. My thoughts and prayers are with those sisters and brothers affected. Reiterated Centre’s support in the ongoing rescue and relief work. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray Ji regarding the situation arising due to flooding and heavy rain in parts of the state. My thoughts and prayers are with those sisters and brothers affected. Reiterated Centre’s support in the ongoing rescue and relief work. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020Spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray Ji regarding the situation arising due to flooding and heavy rain in parts of the state. My thoughts and prayers are with those sisters and brothers affected. Reiterated Centre’s support in the ongoing rescue and relief work. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020
पंतप्रधानांचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही फोनवर चर्चा केली. महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा आढावा आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
-
Prime Minister Shri @narendramodi Ji enquired about the prevailing flood situation due to heavy rains in some districts of Karnataka. @PMOIndia assured all necessary support towards ongoing rescue and relief work.
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Prime Minister Shri @narendramodi Ji enquired about the prevailing flood situation due to heavy rains in some districts of Karnataka. @PMOIndia assured all necessary support towards ongoing rescue and relief work.
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) October 16, 2020Prime Minister Shri @narendramodi Ji enquired about the prevailing flood situation due to heavy rains in some districts of Karnataka. @PMOIndia assured all necessary support towards ongoing rescue and relief work.
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) October 16, 2020
कोकण, गोवा आणि ओडिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस व पुरामुळे 3,000 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून 40,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
राज्यातील आढावा
कोकण, गोवा आणि ओडिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस व पुरामुळे 3000 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून 40,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत 87,000 हेक्टरवर पसरलेल्या ऊस, सोयाबीन, भाज्या, तांदूळ, डाळिंब आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्यास सांगितले आहे. तसंच पुरामुळे नुकसान झालेल्या भागांसाठी केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी केल्याचं राज्य सरकारने सांगितले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.