ETV Bharat / city

Railway Recruitment : रेल्वे भरतीला लागणार ब्रेक; नॉनसेफ्टी पदाच्या एकूण ५० टक्के पदे होणार बरखास्त! - रेल्वे नॉनसेफ्टी ५० टक्के पदे बरखास्त

आता भारतीय रेल्वेतील नॉनसेफ्टी पदाच्या एकूण ५० टक्के पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला ( Railways Ended 50 Percent Post Non Safety Category ) आहे. त्यामुळे रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ( Railway Recruitment ) मोठे संकट आहे.

Railways
Railways
author img

By

Published : May 27, 2022, 8:23 PM IST

मुंबई - आधुनिकेचे कारण देत, भारतीय रेल्वेने मागील सहा वर्षांत ७२ हजार पेक्षा जास्त पदे बरखास्त केले आहे. आता भारतीय रेल्वेतील नॉनसेफ्टी पदाच्या एकूण ५० टक्के पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला ( Railways Ended 50 Percent Post Non Safety Category )आहे. त्यामुळे रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर ( Railway Recruitment ) मोठे संकट आहे. रेल्वेचा या निर्णयामुळे आज ( 27 मे ) रेल्वे कर्मचारी संघटनी मुंबईसह संपूर्ण देशात आंदोलन केले आहे. याशिवाय रेल्वेचा या निर्मामुळे विद्यार्थामध्ये सुद्धा नाराजीचे वातावरण आहे आहे.

उद्योगपतींचा फायद्यांसाठी निर्णय का ? - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे कार्याध्यक्ष वकील सुनिल देवरे यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेत नॉनसेफ्टीमधील येणाऱ्या ५० टक्के पदे रद्द करण्याचा तुगलकी निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यामुळे रेल्वे भरतीच्या अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्र स्टुडंट युनियन रेल्वे मंत्र्यांच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करत आहे. देशातील लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे. मात्र, केंद्र सरकार काही खासगी कंपन्यांचा खिश्यात पैसे भरण्यासाठी रेल्वेतील अनेक काम कंत्राटी पध्दतीने देणे सुरु केले आहे. २०१४ साली भाजपाने वर्षाला २ कोटी रोजगार उपलब्ध करू देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर देशातील जनतेने भाजपला सत्ता दिली होती. पण, जनतेला दिलेल्या आश्वासन पाळले गेले नाही. तर उलट भारतीय रेल्वे उद्योगपतीचा घशात घालण्यासाठी तरुणांकडून नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या आहे. २०१४ ते २०२२ पर्यत साधारणता भारतीय रेल्वेतील ७० ते ८० हजार नोकर भरती कमी केली आहे.

वकील सुनिल देवरे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना

4 हजार पदे बरखास्त - पश्चिम रेल्वेचा वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, पश्चिम रेल्वेवर नॉनसेफ्टीचे 8 हजार 135 नॉनसेफ्टी पदे आहे. ज्यामध्ये वाणिज्य, ऑपरेटिंग, इंजिनिअरींग विभागातील अनेक पदांचा समावेश आहे. आता रेल्वे मंत्र्याच्या या निर्णयामुळे 8 हजार 135 नॉनसेफ्टी पदांपैकी 4 हजार काही पदे बरखास्त करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेचे असे १७ झोन आहे, प्रत्येक झोनमध्ये नॉनसेफ्टी पदे ८ ते १० हजार पदे आहेत. यातील अनेक पदे सध्या रिक्त आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयाविरोधात आज रेल्वे कर्मचारी आंदोलन केले आहे.

हेही वाचा - SambhajiRaje Chhatrapati : पुरातत्व विभाग समिती हातून गेल्याची संभाजीराजेंना खंत?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.