ETV Bharat / city

Without Ticket : भारतीय रेल्वेत सार्वधिक फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर; १८६ कोटी रुपयांचा दंड वसूल - Indian Railway

मध्य रेल्वेचा तिकीट तपासणीचा महसूल भारतीय रेल्वेमध्ये सर्वाधिक मध्य रेल्वेने विनातिकीट/बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाविरुद्ध सुरू ठेवलेल्या मोहिमेमुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये ३ लाख ४१ हजार प्रकरणे आढळून आली आहेत आणि त्यातून २० कोटी ८८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विनातिकीट/बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाची एकूण ३१ लाख १० हजार प्रकरणे आढळून आली आणि त्यातून १८६ कोटी ५३ रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

non-ticket passengers
विनातिकीट
author img

By

Published : Mar 6, 2022, 10:00 AM IST

मुंबई - भारतीय रेल्वेचे ( Indian Railway ) जाळे देशभर पसरले आहे. मध्य रेल्वेचा ( Central Railway zone ) आवाका सर्वाधिक जास्त असल्याने फुकट्या प्रवाशांचा फटका मध्य रेल्वेला बसताना दिसतो आहे. रेल्वेचा तिकीट तपासणी मोहिमेत सर्वाधिक जास्त फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात ३ लाख ४१ हजार फुकट्या प्रवाशांकडून २० कोटी ८८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विनातिकीट/बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाची ३१ लाख १० हजार प्रकरणे आढळून आली आणि त्यातून १८६ कोटी ५३ रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

मध्य रेल्वे फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली -

मध्य रेल्वेचा तिकीट तपासणीचा महसूल भारतीय रेल्वेमध्ये सर्वाधिक मध्य रेल्वेने विनातिकीट/बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाविरुद्ध सुरू ठेवलेल्या मोहिमेमुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये ३ लाख ४१ हजार प्रकरणे आढळून आली आहेत आणि त्यातून २० कोटी ८८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विनातिकीट/बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाची एकूण ३१ लाख १० हजार प्रकरणे आढळून आली आणि त्यातून १८६ कोटी ५३ रुपये महसूल प्राप्त झाला आहे. जो सर्व क्षेत्रीय रेल्वेंमधील महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक आहे. मोहिमेदरम्यान, कोविडचे योग्य वर्तन न पाळणाऱ्या आणि मास्क न परिधान करणाऱ्या ५२ हजार ७६५ व्यक्ती आढळून आल्या आणि त्यांच्याकडून ८४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.

वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन -

उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमे दरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे व्युत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.

हेही वाचा : नाविन्यपूर्ण कामांच्या जोरावर मुंबई सुंदर बनविणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.