ETV Bharat / city

CCTV : मुंबईतील रेल्वे स्थानकांवर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लागणार; सुरक्षा व्यवस्था होणार बळकट - सीसीटीव्ही कॅमेरे

उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणखी एक हजार सीसीटीव्ही लावण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने आखली आहे. नुकतेच मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी मिळून स्थानकांवरील ब्लॉक स्पॉटची पाहणी केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा निगराणी न येणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 26, 2022, 9:31 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणखी एक हजार सीसीटीव्ही लावण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने आखली आहे. नुकतेच मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी मिळून स्थानकांवरील ब्लॉक स्पॉटची पाहणी केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा निगराणी न येणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

ब्लॉक स्पॉट शोधण्याची मोहीम - सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वे स्थानकांवर एकूण 3 हजार 141 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यापैकी एकात्किम सुरक्षा यंत्रणा राबविण्यात आलेल्या 6 प्रमुख रेल्वे स्थानकांवर 1 हजार 151 कॅमेऱ्यांची नजर आहे. मात्र, तरीही अनेकदा रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन तरुणी व महिलांना छेडछाडीच्या प्रकार तर सर्वसामान्यांच्या मोबाइल, पाकीट चोरीचे प्रमाणही वाढत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे बहुतांश स्थानक परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या क्षेत्रात येत नसल्याने त्याच्या फायदा घेत अनेकदा चोरटे त्या परिसरातच चोरी करत असल्याचा घटना समोर आल्या आहे. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेताना पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. परिणामी यावर उपायोजना म्हणून लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तरित्या मुंबई विभागातील स्थानकांवरील ब्लॉक स्पॉट शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेराचा निगराणी न येणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

डिसेंबर २०२२ पर्यंत लागणार सीसीटीव्ही - मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, मुंबई विभागातील अनेक स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेराचा निगराणी न येणाऱ्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची योजना आखली आहे. सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे डिसेंबर, 2022 पर्यंत लावण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकांवर सध्या 300 सीसीटीव्ही कॅमेरे आहे. तरीही काही परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या क्षेत्रात येत नाही. त्यामुळे सीएसएमटी स्थानकांवर आणखी 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.

हेही वाचा - BMC Tender Cancel : सेना भाजपच्या संघर्षात मुंबई महापालिकेचे अनेक टेंडर रद्द, मुंबईच्या विकास कामांना बसतेय खीळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.