मुंबई - शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या बेघर नागरिकांसाठी आरपीएफच्या पुढाकाराने १३ ठिकाणी २०० हून अधिक गरजू आणि निराधार नागरिकांना भोजन देण्यात येत आहे.
![mumbai RPF](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-28-rpf-7201159_28032020155537_2803f_1585391137_378.jpg)
आरपीएफ कर्मचार्यांच्या कल्याण युनिटकडून सुमारे २००० मास्क तयार करण्यात आले आहेत. या मास्कचा वापर आरपीएफ कर्मचार्यांसोबतच रेल्वे स्थानक, यार्ड, कार्यशाळा व उत्पादन युनिटच्या कर्मचाऱ्यांना देखील याचा पुरवठा होत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे आपत्कालीन कर्मचार्यांची थर्मल स्क्रीनिंग आरपीएफकडून करण्यात येत आहे. मुंबई विभागातील ३० ठिकाणी एकूण २४७ गाड्या (रॅक) आणि ६५ लोकोमोटीव्ह (इंजिन)ची सुरक्षा या काळात वाढवण्यात आलीय. रेल्वे रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी, नियंत्रण कक्षातील कर्मचार्यांच्या वाहतुकीसाठी आरपीएफकडून १७ वाहनांची व्यवस्था केली आहे.