मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे पुर्व खबरदारी घेत मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेतील 'एसी लोकल' बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईत रेल्वेने दररोज जवळपास 80 लाख लोक प्रवास करतात. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि रेल्वेतील गर्दीही कमी करता येत नसल्यामुळे सध्या ठाणे येथील एसी ट्रान्स हार्बर आणि वेस्टर्न मार्गावरील एसी लोकल 20 ते 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली.
मध्य मार्गावरील आणि पश्चिम मार्गावरील रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे ;
एसी सबअर्बन सेवा
मुंबई विभागातील ट्रान्स हार्बर मार्गावर चालणार्या 16 एसी उपनगरी सेवा 20 मार्च ते 31 मार्च पर्यंत रद्द
मेल / एक्सप्रेस सेवा
गाडी क्रमांक | गाडीचे नाव | गाडी रद्द केल्याचा कालावधी |
11011 | एलटीटी ते नांदेड एक्सप्रेस | JCO 25 मार्च |
11012 | नांदेड ते एलटीटी एक्सप्रेस | JCO 26 मार्च |
11025 | भुसावळ ते पुणे ते भुसावळ एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
11047/11048 | मिरज ते हुबळी ते मिरज एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
11075 | एटीटी ते बिदर एक्सप्रेस | 24 मार्च ते 31 मार्च |
11076 | बिदर ते एलटीटी एक्सप्रेस | 25 मार्च ते 1 मार्च |
11083 | एलटीटी ते काझीपेट ताडोबा एक्सप्रेस | 20 मार्च ते 27 मार्च |
11084 | काझीपेट ते एलटीटी ताडोबा एक्सप्रेस | 21 मार्च ते 28 मार्च |
11085 | एलटीटी ते माडगाव दाभोळ डेकर एक्सप्रेस | 23, 26 आणि 30 मार्च |
11086 | माडगाव ते एलटीटी डबल डेकर एक्सप्रेस | 24, 27 आणि 31 मार्च |
11304 | कोल्हापूर ते मंगळुरु एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
11303 | मंगळुरु ते कोल्हापूर एक्सप्रेस | 21 मार्च ते 01 एप्रिल |
11416 | कोल्हापूर ते बिदर एक्सप्रेस | JCO 25 मार्च |
11415 | बिदर ते कोल्हापूर एक्सप्रेस | JCO 26 मार्च |
12025/12026 | पुणे ते सिकंदराबाद ते पुणे शताब्दी एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
12071/12072 | दादर ते जालना ते दादर जनशताब्दी एक्सप्रेस | 20मार्च ते 31 मार्च |
12157/12158 | पुणे ते सोलापुर ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
12169/12170 | पुणे ते सोलापूर ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
12223 | एलटीटी ते एर्नाकुलम (आठवड्यातून एकदा) दुरांतो एक्सप्रेस | 21 मार्च ते 31 मार्च |
12224 | एर्नाकुलम ते एलटीटी दुरांतो (आठवड्यातून एकदा) | 22 मार्च ते 01 एप्रिल |
22133 | सोलापूर ते कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |
22134 | कोल्हापूर ते सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस | 21 मार्च ते 01 एप्रिल |
22155/22156 | सोलापूर ते मिरज ते सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस | 20 मार्च ते 31 मार्च |