मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला करण सजनानी सोबत असलेल्या संबंधांबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पकडून अटक करण्यात आली. त्यानंतर समीर खान यांच्या बांद्रा परिसरातील घरावर यांचे एनसीबीने छापेमारी केली आहे.
समीर खान व करण संजनानी मध्ये घडले व्हाट्सअॅप चॅट, नवाब मालिकांची ही आहे प्रतिक्रिया-
करण सजनानी आणि समीर खान यांच्यामध्ये झालेल्या व्हाट्सअप चॅट मध्ये अमली पदार्थांच्या तस्करी बाबत चर्चा करण्यात आलेली होती. याबरोबरच समीर खान याच्या बँक अकाउंटमधून करण सजनानी या ब्रिटिश अनिवासी भारतीयाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. मात्र ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे किती होते, याचा खुलासा एनसीबीने केलेला नाही. समीर खानला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यावर बोलताना म्हटले आहे, की कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायद्याने त्याचे काम करावे व सत्य लवकरच समोर येईल, असे म्हणत नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील बांद्रा खार परिसरामध्ये छापेमारी करून ब्रिटिश अनिवासी भारतीय असलेल्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या करण सजनानी यास एनसीबीने अटक केली होती. या बरोबरच अभिनेत्री दिया मिर्झा हिची माजी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या राहिला फर्निचरवालासह आणखीन एका महिलेला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या झालेल्या चौकशीमध्ये मुंबईतल्या केम्स कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानवाला उर्फ राम कुमार तिवारी या आरोपीला या प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने 15 हजारांचा जामीन मंजूर केलेला आहे.
करण सजनानी हा राम कुमार तिवारी याच्याकडे काही काही दिवसानंतर जाऊन एक पाकीट देत होता . राम कुमार तिवारी यांची बॉलीवुड इंडस्ट्री मधल्या सेलिब्रेटिं सोबत मोठी ओळख होती. त्यामुळे करण सजनानीकडे असलेले अमलीपदार्थ सहजासहजी बॉलिवूड मधील सेलिब्रिटींना विकता यावे म्हणून रामकुमार तिवारीच्या मदतीने करन सजनानी अमली पदार्थाची तस्करी करत असला तर समोर आलेल आहे.