ETV Bharat / city

Assembly Speaker Election : सत्तासंघर्षात अध्यक्षपद कोणाकडे जाणार? भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच - नाना पटोले

शिवसेनेमध्ये बंडखोरी होऊन भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीची चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून ( BJP ) राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेकडून ( Shivsena ) राजन साळवी ( Rajan Salvi ) यांनी अर्ज भरला आहे. उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेसने राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. याआधी ही निवडणूक का घेतली नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बहुमत आहे की, महाविकास आघाडीकडे संख्याबळ अधिक आहे याचा फैसला होणार आहे.

assembly speaker election  2022
assembly speaker election 2022
author img

By

Published : Jul 2, 2022, 4:09 PM IST

Updated : Jul 2, 2022, 6:20 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले असून रविवार ( 3 जुलै ) आणि सोमवार ( 4 जुलै ) असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. 3 तारखेलाच अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच संख्याबळाचा फैसला होणार असला तरी या निवडणुकीवर विरोधकांनी, प्रामुख्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर रंगतदार ठरत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपकडून नार्वेकर यांनी अर्ज भरला - भारतीय जनता पार्टीच्या ( BJP ) वतीने राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. राहुल नार्वेकर यांना उभे करून भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडले आहे. कारण राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेना नंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपा असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक तशी एक शिवसैनिक विरुद्ध दुसरा शिवसैनिक अशीच होत आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीच्या माध्यमातून शिवसेनेतील ( Shivsena ) आणखी काही मते फोडण्याचा भाजपची रणनीती आहे.

शिवसेनेचे राजन साळवी अध्यक्षपदाच्या शर्यतीत - विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राजन साळवी ( Rajan Salvi ) यांनी आपला अर्ज भरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल केला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी म्हटले होते. पण अखेरच्या क्षणी काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी ( MVA Speaker Election Candidate Rajan Salvi ) यांना पाठिंबा देण्याचे ठरवले, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांची भूमिका महत्त्वाची - राज्यपालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगत 3 व 4 जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. 3 जुलैला प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला सर्वप्रथम काँग्रेसने आक्षेप घेतला. जानेवारी २०२१ रोजी काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra assembly speaker election ) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आता काँग्रसने आता आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आपण जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती. मग, आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपालांनी दिलेल्या पत्राचाच आधार? - राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या, ३ आणि सोमवारी ४ जुलै रोजी बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात नव्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असून, त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्या संदर्भातील पत्रही दिले होते. याच पत्राचा आधार घेऊन काँग्रेसने आता राज्यपालांवर टीका केली आहे. या सर्व प्रकरणात लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा झाल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

निवडणूक का नव्हती झाली? - राजभवनाकडून विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत महाविकास आघाडीला पत्र पाठविण्यात आले होते. या पत्रात म्हटले होते की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने, विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख निश्चित करता येणार नाही. तेव्हापासून अध्यक्षपदाची निवडणुकीचा विषय अडलेला होता. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आमचे शिष्टमंडळ तीन वेळा राज्यपालांना भेटले होते. अध्यक्षांची निवड करू द्या, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नाकारली होती. आता मात्र ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, याबद्दल शंका उपस्थित होते. या निवडीसंदर्भात आम्ही जो कायद्यात बदल केला होता. तो वैध ठरला का? की जुन्याच पद्धतीने ही निवड केली जाणार आहे, याचे उत्तर अपेक्षित आहे. आणि त्यादरम्यान महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल कार्यालयाकडून दिलेल्या पत्राचा आधार घेत व ते पत्र पुन्हा प्रकाशित करत बाळासाहेब थोरात यांनी थेट आता राज्यपालांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे.

कोण जिंकणार अध्यक्षपदाची निवडणूक - अध्यक्षपदाची निवडणूक उद्यावर येऊन ठेपली आहे. भाजपकडून नार्वेकर आणि शिवसेनेचे सावळी यांच्यामध्ये थेट लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. नार्वेकर यांच्या बाजुने मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोर शिवसेना गटाचे 40 आणि 10 अपक्ष आमदार आणि त्याशिवाय भाजपचे 106 व भाजपसोबत असलेले जवळपास 14-15 असे 120 आमदार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांना 170 आमदारांचे मतदान निश्चितपणे होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडे उरलेले 16, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 एवढेच आमदार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर सहज विजयी होतील, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. तथापि, ऐनवेळी काही घडामोडी होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार साळवी बाजी मारतात का, हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात रात्री उशिरा मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत चर्चा

Last Updated : Jul 2, 2022, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.