ETV Bharat / city

Reaction On Mumbai Traffic : 'अमृता फडणवीस कशाच्या आधारावर बोलत आहेत?' महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा सवाल - वाहतूक कोंडीमुळे मुंबईत घटस्फोट

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत केलेल्या विधानानंतर ( Amruta Fadnavis Mumbai Trafic Jam Statement ) सामाजिक संस्थेकडून त्यांच्या विधानाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले ( Mumbai NGOs Reaction On Traffic Jam ) आहे. अमृता फडणवीस कशाच्या आधारावर बोलत आहेत? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

'अमृता फडणवीस कशाच्या आधारावर बोलत आहेत?' महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा सवाल

author img

By

Published : Feb 5, 2022, 6:28 PM IST

Updated : Feb 5, 2022, 6:37 PM IST

मुंबई : मुंबईतील ट्राफिक मुळं दरवर्षी तीन टक्के घटस्फोट होतात, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ( Amruta Fadnavis Mumbai Trafic Jam Statement ) केलं. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याची राजकारणातील अनेकांनी खिल्ली उडवली. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आता महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनेही प्रतिक्रिया दिल्या ( Mumbai NGOs Reaction On Traffic Jam ) आहेत. मुंबईतल्या ट्राफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या मुंबईतील कोरो या संस्थेशी संपर्क करत घटस्फोटाची नेमकी कारणं काय असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

'अमृता फडणवीस कशाच्या आधारावर बोलत आहेत?' महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा सवाल

ट्राफिकमुळे घटस्फोटाची तक्रार नाही

या संदर्भात बोलताना कोरो संस्थेच्या संभवी महाडिक म्हणाल्या की, "मुंबईतल्या ट्राफिकमुळे घटस्फोट होतात. हे विधान अमृता फडणवीस यांनी कोणत्या आधारे केलं? त्यासंदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे हे अजून अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु, आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्यामध्ये एकमेकांना वेळ न देण, पैशांची अडचण, कौटुंबिक हिंसाचार, घरातील वाद विवाद, दोघांमध्ये संवाद नसणं, मुलांना न सांभाळणं, एकमेकांना समजून न घेणं अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात. पण, अद्यापही आमच्याकडे मुंबईतल्या ट्राफिकमुळे घटस्फोटाची मागणी करणारी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही."

या आधारे केलं वक्तव्य

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमृता फडणवीस यांनी आपला वक्तव्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांनी मंकी सर्वे या वेबसाईटच्या सर्वेच्या आधारे आपण हे वक्तव्य केल्याचं म्हटलं होतं.

Last Updated : Feb 5, 2022, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.