ETV Bharat / city

पुणे पोलिसांचे पथक किरण गोसाविला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये किरणने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांचे पथक किरण गोसाविला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना झाले आहे.

पुणे पोलिसांचे पथक किरण गोसाविला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना
पुणे पोलिसांचे पथक किरण गोसाविला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना
author img

By

Published : Oct 26, 2021, 11:10 AM IST

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये किरणने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांचे पथक किरण गोसाविला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना झाले आहे.

लखनऊ पोलिसांचा गोसाविला अटक करुन घेण्यास नकार

व्हायरल झालेल्या ऑडीयो क्लिपमध्ये किरणने आपण लखनऊमध्ये असल्याचे सांगत सरेंडर करण्याची मागणी केली होती. मात्र, लखनऊ पोलिसांनी त्याला अटक करुन घेण्यास नकार दिला. तसेच, दुसऱ्या ठिकाणी सरेंडर होण्याचा देखील सल्ला दिला. मात्र, ही ऑडीयो क्लिप व्हायरल झाल्यानंतर अर्थातच किरणचे ठिकाण समजल्यानंतर त्याची अटक निश्चित असून त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलीसांचे पथक रवाना झाले आहे.

कोण आहे गोसावी

क्रुझ ड्रग प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे गोसावी वादात अडकला आहे. त्यातच त्याच्याविरोधातील काही फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत.

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी गोसावीच्या शोधत

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर पुणे पोलिसांनी गोसावी याचा शोध सुरू केला आहे. गोवासीवर फरासखाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जाहीर केली होती

काय आहे प्रकरण

किरण गोसावीवर पुण्यात फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. गोसावी याने आपल्या फेसबुक पेजवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत.

गोसावी कडून अनेकांची फसवणूक

किरण गोसावी यांच्या विरोधात पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसवले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.

हेही वाचा - साक्षीदार किरण गोसावी लखनौ पोलिसांना येणार शरण, ऑडिओ क्लिप व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.