ETV Bharat / city

Pune Bhosari Land Scam भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा कायम

Pune Bhosari Land Scam पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला मंदाकिनी खडसे चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहेत.याची नोंद घेत हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे.

Pune Bhosari Land Scam
Pune Bhosari Land Scam
author img

By

Published : Aug 23, 2022, 8:16 AM IST

मुंबई राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. 16 सप्टेंबरपर्यंत कुठलेही कठोर कारवाई न करण्याचे निर्णय देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप Pune bhosari land scam आहेत. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ तर्फे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलाचा दिला होता. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी देखील हे देखील आरोपी असून त्यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे.

काय आहे प्रकरण एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ३१ कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त ३.७ कोटी रुपयांना विकल्याचा दावा करण्यात आला होता. Pune bhosari land scam त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र 52 2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

ईडी चौकशी नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद करण्यात आली आहे. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत, असेही आरोप त्यांच्यावर आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने ईडी चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा Mumbai Crime सराईत चोराला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.