मुंबई - मुंबईत वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मुंबई उच्च न्यायालयाने कामाचे तास कमी केल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जनहित याचिका ( PIL Against Highcourt SOP ) दाखल करण्यात आली असून या याचिकेवर मंगळवारी सुनावणी ( SOP Hearing On Tuesday ) होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात सध्या तीनच तास काम सुरू असल्याने अनेक याचिका प्रलंबित असल्याचे ( Mumbai Highcourt Pendancy ) जनहित याचिकेत म्हटले आहे.
काय म्हटले आहे जनहित याचिकेत -
मुंबईत वाढत्या कोरोनामुळे मुंबई उच्च न्यायालयाने कामकाजाचे तीन तास करण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तयार केलेल्या नियमावलीनुसार केवळ तीनच तास ऑनलाइन कामकाज आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात अनेक प्रकरण प्रलंबित आहेत. पहिला लाटीमध्ये कामकाज तीन तास चालत असले तरी ऑनलाइन पद्धतीने दिवसभर न्यायालय सुरू राहायचे. मात्र, आता केवळ तीन तास कामकाज होत आहे. त्यामुळे अनेक याचिकाकर्त्यांच्या याचिका प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा, अशी मागणी अॅड. घनश्याम उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे.
हेही वाचा - Skulls Found in Biogas Wardha : डॉक्टर कदमांच्या दवाखान्यात सापडली वन्यप्राण्यांची कातडी