ETV Bharat / city

Andheri By Election: मतदानाच्या दिवशी अंधेरीत सार्वजनिक सुट्टी

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (andheri east by election) 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Public holiday in Andheri)

andheri east by election
andheri east by election
author img

By

Published : Oct 15, 2022, 4:17 PM IST

मुंबई: निवडणूक आयोगाने बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी (andheri east by election) 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Public holiday in Andheri)

या कार्यालयांना असणार सुट्टी: ही सार्वजनिक सुट्टी अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

मोठ्या प्रमाणात मतदान करा - जिल्हाधिकारी: या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

लटके विरुद्ध पटेल: अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकी साठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत मात्र मुख्य लढत ही ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच आहे.

ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करताना
ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करताना

प्रचाराचा धुरळा उडाला - अंधेरीच्या पोट निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. शिवसेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नामांकन अर्ज भरले. या मतदारसंघात एकूण २ लाख ७३ हजार मतदार आहेत. उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्यांमध्ये ही लोकसंख्या विभागलेली आहे. मतदारसंघात मराठी भाषिकांसह पारशी, पंजाबी, उत्तर भारतीय, बिहारी असा बहुभाषिक मतदार वर्ग येतो. या विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे नऊ प्रभाग येतात. मतदारसंघात आत्तापर्यंत शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.