ETV Bharat / city

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अर्थसंकल्पात १२३२.१७ कोटी रुपयांची तरतूद

पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलणे, पाणी पुरवठा करण्यासाठी जलबोगदे बांधणे, विहार तलावातून वाहून जाणारे पाणी भांडुप संकुल येथील जशुद्धीकरण केंद्राकडे वळवणे, बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आदी कामांसाठी पाणी पुरवठा प्रकल्प विभागातंर्गत ६७० कोटी तर जल वितरण सुधारणा कामांसाठी ५६२.१७ कोटी अशी एकूण १२३२.१७ कोटी रुपयांची तरतूद मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात केली आहे.

author img

By

Published : Feb 4, 2021, 8:04 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई - मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध पाणी प्रकल्प राबवले जात आहेत. पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलणे, पाणी पुरवठा करण्यासाठी जलबोगदे बांधणे, विहार तलावातून वाहून जाणारे पाणी भांडुप संकुल येथील जशुद्धीकरण केंद्राकडे वळवणे, बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आदी कामांसाठी पाणी पुरवठा प्रकल्प विभागातंर्गत ६७० कोटी तर जल वितरण सुधारणा कामांसाठी ५६२.१७ कोटी अशी एकूण १२३२.१७ कोटी रुपयांची तरतूद मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

नि:क्षारीकरण प्रकल्प -

मुंबई महापालिकेचा सन २०२१ - २२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्थायी समितीला सादर केला. यावेळी बोलताना, २०० दशलक्ष लीटरचा नि:क्षारीकरण प्रकल्प, भविष्यकालीन वाढीव गरज लक्षात घेऊन ४०० दशलक्ष लीटर क्षमतेसह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने सल्लागार नेमला असून त्याकडून अहवाल मागवला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने ५ लाखांची तरतूद केली असून हा अहवाल सप्टेंबर २०२१ पर्यंत येईल अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

विद्युत प्रकल्प -

मध्य वैतरणा धरण येथे २० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प व ८० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प यांचा अंतर्भाव असलेला 'संकरीत अक्षय ऊर्जा प्रकल्प' उभारण्यात येणार आहे. शिवाय धरणे आणि तलावांत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतील. मोडक सागर आणि इतर तलावांमध्ये निर्माण होणारी हरित ऊर्जा म्हणजे २०० दशलक्ष लीटर नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी त्याची वाढीव क्षमता लक्षात घेता वापरण्याचे नियोजन आहे.

जलबोगदे -

चेंबूर ते वडाळा आणि पुढे परळपर्यंतचा जलबोगदा एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होईल. अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंतचा जलबोगदा ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. बाळकुम ते मुलुंडदरम्यान जलवहन बोगद्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व जलवहन बोगद्यांच्या कामासाठी ३१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मलबार टेकडी जलाशयाच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जलवाहिन्या बदलणे -

चिंचवली ते येवई दरम्यान ३ हजार मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. बाळकुम ते सॅडल टनेलदरम्यान ३ हजार मिमी व्यासाच्या मुख्य वाहिनीचे काम सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. भांडुप अँकर ते मरोशी गेटदरम्यान २ हजार ४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम जून २०२२ पर्यंत पूर्ण होईल. भांडुप संकुल येथे जलबोगद्याच्या कुपकापासून १ हजार ९१० दशलक्ष लीटर जलप्रक्रिया केंद्रापर्यंत ४ हजार मिमी व्यासाच्या अंतर्गत जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. मरोशी ते सहार गाव दरम्यान २ हजार मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.