ETV Bharat / city

Darekar Says What's Wrong With That : 'मजूर'असल्याचे सिद्ध करा! नोटीसवर दरेकर म्हणतात त्यात वावगे काय? - Election of Board of Directors

मुंबई बँकेच्या (Mumbai Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये (Election of Board of Directors) मजूर संस्था गटातून (Labor Organization Category) उमेदवार म्हणून उभे असलेले प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मंजूर असल्याचे सिद्ध करावे अशी नोटीस राज्याच्या सहकार विभागाने बजावली आहे. या बाबत बोलताना त्यांनी म्हणले आहे की, जर एखादा मजूर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर त्यात वावगे काय?

Pravin Darekar
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Dec 15, 2021, 5:01 PM IST

मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गेल्या काही वर्षांपासून मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. यंदाही त्यांनी मजूर संस्था गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र विरोधी पक्षनेतेपदी असलेली व्यक्ती मजूर कशी असू शकते ? असा आक्षेप सहकार विभागाकडे नोंदविण्यात आला आहे. सहकार विभागाने याची गंभीर दखल घेत प्रवीण दरेकर यांना मजूर असल्याचे सिद्ध करावे अशी नोटीस बजावली आहे. दरेकर यांनी मात्र हे राजकीय षड्यंत्र आहे म्हणत यात वावगे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे नोटीसमधे?
दरेकर यांनी मुंबई बँकेच्या निवडणुकीसाठी प्रतिज्ञा मजूर संस्थे मार्फत प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला आहे. मजूर म्हणून ते निवडणूक लढवत आहेत. मात्र सहकार विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार सहकार विभागाने आक्षेप नोंदवत दरेकर यांना नोटीस बजावली असून यात आपण मजूर आहात? हे सिद्ध करावे असे म्हटले आहे.
बांधकाम व्यवसायाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला अथवा त्याच्या नातेवाइकाला मजूर संस्थेमध्ये सदस्यत्व देता येत नाही असे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेली व्यक्ती मजूर कशी आहे असेही सहकार विभागाने विचारले आहे.

सुपरवायझर म्हणूनही उचलले वेतन
दरेकर यांनी प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या माध्यमातून सुपरवायझर म्हणून दोन हजार सतरा मध्ये बारा हजार तीनशे पन्नास रुपये वेतन उचलल्याचे नमूद आहे. वास्तविक सुपरवायझर हे पदही मजूर या वर्गात येत नाही, मजूर म्हणजे अंगमेहनत आणि शारीरिक श्रमाचे काम करणारी व्यक्ती असा होतो. त्यामुळे मजूर वर्गात बसत नाहीतअसे निरीक्षणही सहकार विभागाने नोंदवले आहे. दरेकर यांना विरोधी पक्षनेते म्हणून दोन लाख 50 हजार रुपयांचे मानधन दिले जाते तसेच त्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात दोन कोटी 9 लाख रुपये स्थावर मालमत्ता दाखवली आहे. त्यामुळे दरेकर यांनी 21 डिसेंबर रोजी आपले म्हणणे लेखी अथवा प्रत्यक्ष येऊन मांडावे असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.
मजुरांना अधिकार नाही का
सहकार विभागाच्या या नोटीस बाबत प्रवीण दरेकर यांना विचारले असता हे राजकीय षड्यंत्र आहे असा आरोप दरेकर यांनी केला आहे. मजूर संस्थांचा उद्देश हा मजुरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे त्यामुळे जर एखादा मजूर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर त्यात वावगे काय असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Notice to Praveen Darekar : 'मजूर' आहात हे स्पष्ट करण्यासाठी प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.