मुंबई: राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडे असलेल्या यादी नुसार ज्या महिलांची या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. तसेच ज्या महिला वेश्याव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत अश्या महिलांना हे शिधापत्रिका देण्यात येणार आहे. यासोबतच शिधापत्रक प्राप्त करण्यासाठी लागणारे पुरावे सादर करण्यास काही अडचण निर्माण झाल्यास त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे.
त्यामुळे ओळखीचा पुरावा किंवा रहिवाशी पुरावा देण्याबाबत पीडितांना सूट देण्यात आली आहे. या पुराव्यांची मागणी पीडित महिलांकडून केली जाणार नाही असं नमूद करण्यात आला आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या यादीतील महिलांनाच हे शिधापत्रिका वाटले जाणार असून शिधापत्रिका वाटणाऱ्या महिला या भारतीयचं असल्या पाहिजे याची काटेकोर काळजी कार्यान्वित यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.