ETV Bharat / city

थोडा तरी दिलासा मिळेल, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वारांगणांची प्रतिक्रिया - Prostitute Reaction on Supreme court Verdict

सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश दिले आहेत की त्यांनी वारांगणा कामात हस्तक्षेप करू नये. वेश्या व्यवसाय हा 'व्यवसाय' म्हणून लक्षात घेऊन पोलिसांनी स्वमर्जीने सेक्स वर्क करणाऱ्या महिलांवर फौजदारी कारवाई करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना नेमकं काय वाटतं ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या..

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : Jun 5, 2022, 4:10 PM IST

Updated : Jun 5, 2022, 7:44 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश दिले आहेत की त्यांनी वारांगणांच्या कामात हस्तक्षेप करू नये. सेक्स वर्क हा 'व्यवसाय' म्हणून लक्षात घेऊन पोलिसांनी स्वमर्जीने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर फौजदारी कारवाई करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर वारांगणांना नेमकं काय वाटतं ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या..

प्रतिक्रिया
थोडा तरी दिलासा मिळेल -
मुंबईतील कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. अनेक महिला स्वतःच्या मर्जीने या ठिकाणी व्यवसाय करतात. पण, अनेक वेळा पोलिसांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे एका वारांगणाने सांगितले. "आम्ही आमच्या मर्जीने या व्यवसायात आलो. अनेक वेळा आम्हाला पोलीस मारतात, काही वेळा जेलमध्ये डांबून ठेवतात. दर महिन्याला आमच्याकडून हप्ता घेतला जातो. न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला थोडा तरी दिलासा मिळेल, अशी आशा आहे."

मजबूरी साहेब म्हणून आले - तर आणखी एक वारांगणा म्हणाल्या की, "या व्यवसायात मी माझ्या मर्जीने आले. याच्या आधी मी एका रेती व्यवसायीकाडे काम करत होते. तिथे बरेच पुरुष माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे. त्यातच नवऱ्याने सोडले होते. त्या पुरुषांच्या घाणेरड्या नजरांची मला भीती वाटायची. मग, विचार केला लोकांच्या नजरा तर काही बदलत नाहीत. मग याच व्यवसायात गेल तर काय वाईट ? त्यातच एका लहान मुलाची जबाबदारी होतीच. मग, या व्यवसायात आले आणि मागची बारा वर्षे मी माझ्या मर्जीने हा व्यवसाय करते. न्यायालयाने आता जो निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी चांगलाच आहे."

मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे - यासंदर्भात आम्ही अनेक वर्षे वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, "न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, न्यायालयाने कुंटणखान्यात चालवणे हे मात्र बेकायदेशीर म्हटले आहे. इथं वडापाव विकणारे देखील पोट भरण्यासाठी रस्त्यावर गाडी लावतो. तसाच यांना सुद्धा अधिकार आहे. काहीच महिला या व्यवसायात स्वमर्जीने येतात. अनेक वेळा त्यांना विविध आमिष दाखवून किंवा फसवून आणले जाते. बाहेरच्या देशातून येणाऱ्या महिला या काही वेळा स्वमर्जीने येतात. त्यामुळे यात यासाठीसुद्धा काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.", असे गुरव यांनी म्हटले आहे.

26 मे या महिलांसाठी ऐतिहासिक दिवस - न्यायालयाच्या या निर्णयामुळे 26 मे हा दिवस वारांगणांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. परस्पर संमतीने देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांची अडवणूक करण्याचा, त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देहविक्री हा व्यवसाय असून या व्यवसायातील महिलांना त्यांचा सन्मान आणि कायद्याने पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणे इतर आजूबाजूच्या शहरांतही वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामध्ये ग्राहक कमी झाल्याने अनेक माहिलांनी यातून काढता पाय घेतला. मात्र, आता पुन्हा सुरू झालेल्या व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वारांगणांचे म्हणणे आहे. ग्राहक वेळेवर पैसे देत नाहीत तर पैसे आलेच तर ते पोलिसांना द्यावे लागतात, असेही येथील त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Alerts On Increasing Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या सतर्क राहण्याच्या सुचना

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश दिले आहेत की त्यांनी वारांगणांच्या कामात हस्तक्षेप करू नये. सेक्स वर्क हा 'व्यवसाय' म्हणून लक्षात घेऊन पोलिसांनी स्वमर्जीने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर फौजदारी कारवाई करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर वारांगणांना नेमकं काय वाटतं ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या..

प्रतिक्रिया
थोडा तरी दिलासा मिळेल - मुंबईतील कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. अनेक महिला स्वतःच्या मर्जीने या ठिकाणी व्यवसाय करतात. पण, अनेक वेळा पोलिसांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे एका वारांगणाने सांगितले. "आम्ही आमच्या मर्जीने या व्यवसायात आलो. अनेक वेळा आम्हाला पोलीस मारतात, काही वेळा जेलमध्ये डांबून ठेवतात. दर महिन्याला आमच्याकडून हप्ता घेतला जातो. न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला थोडा तरी दिलासा मिळेल, अशी आशा आहे."

मजबूरी साहेब म्हणून आले - तर आणखी एक वारांगणा म्हणाल्या की, "या व्यवसायात मी माझ्या मर्जीने आले. याच्या आधी मी एका रेती व्यवसायीकाडे काम करत होते. तिथे बरेच पुरुष माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे. त्यातच नवऱ्याने सोडले होते. त्या पुरुषांच्या घाणेरड्या नजरांची मला भीती वाटायची. मग, विचार केला लोकांच्या नजरा तर काही बदलत नाहीत. मग याच व्यवसायात गेल तर काय वाईट ? त्यातच एका लहान मुलाची जबाबदारी होतीच. मग, या व्यवसायात आले आणि मागची बारा वर्षे मी माझ्या मर्जीने हा व्यवसाय करते. न्यायालयाने आता जो निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी चांगलाच आहे."

मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे - यासंदर्भात आम्ही अनेक वर्षे वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, "न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, न्यायालयाने कुंटणखान्यात चालवणे हे मात्र बेकायदेशीर म्हटले आहे. इथं वडापाव विकणारे देखील पोट भरण्यासाठी रस्त्यावर गाडी लावतो. तसाच यांना सुद्धा अधिकार आहे. काहीच महिला या व्यवसायात स्वमर्जीने येतात. अनेक वेळा त्यांना विविध आमिष दाखवून किंवा फसवून आणले जाते. बाहेरच्या देशातून येणाऱ्या महिला या काही वेळा स्वमर्जीने येतात. त्यामुळे यात यासाठीसुद्धा काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.", असे गुरव यांनी म्हटले आहे.

26 मे या महिलांसाठी ऐतिहासिक दिवस - न्यायालयाच्या या निर्णयामुळे 26 मे हा दिवस वारांगणांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. परस्पर संमतीने देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांची अडवणूक करण्याचा, त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देहविक्री हा व्यवसाय असून या व्यवसायातील महिलांना त्यांचा सन्मान आणि कायद्याने पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दरम्यान, मुंबईप्रमाणे इतर आजूबाजूच्या शहरांतही वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामध्ये ग्राहक कमी झाल्याने अनेक माहिलांनी यातून काढता पाय घेतला. मात्र, आता पुन्हा सुरू झालेल्या व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे वारांगणांचे म्हणणे आहे. ग्राहक वेळेवर पैसे देत नाहीत तर पैसे आलेच तर ते पोलिसांना द्यावे लागतात, असेही येथील त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Alerts On Increasing Corona : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या सतर्क राहण्याच्या सुचना

Last Updated : Jun 5, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.