मुंबई - पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची मुदत होती. मात्र ही मुदत वाढवून मिळावी यासाठी राज्यसरकरने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. 23 जुलैपर्यंत मुदत वाढ द्यावी, अशी मागणी केंद्रसरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे. यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांचे अर्ज -
पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलैपर्यंत यो
जनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणासाठी कोणाच्याही पाया पडायला तयार - छगन भुजबळ