ETV Bharat / city

'मिठी' नदीला 'मिठी' करण्यासाठी कसली कंबर...'या' मंत्र्यांनी करारावर केल्या स्वाक्षऱ्या

26 जुलैच्या प्रलयाला कारणीभूत ठरलेल्या आणि दुर्लक्षामुळे नाला झालेल्या या मिठीला 'मिठी' करण्यासाठी एमएमआरडीए आणि पालिकेने कंबर कसली. कोट्यवधीचा खर्च केला. पण अद्याप मिठी काही मिठी होऊ शकलेली नाही. मात्र, आता पुन्हा एमएमआरडीएने आपला मोर्चा मिठीकडे वळवला आहे.

author img

By

Published : Sep 3, 2020, 5:18 PM IST

मिठी नदी
मिठी नदी

मुंबई - मिठी नदी आता लवकरच खऱ्या अर्थाने 'मिठी' होणार आहे. म्हणजेच आता मिठी नदीचे पाणी लवकरच स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. बायोमेडीएशन आणि फायटोरोमेडीएशन पध्दतीचा वापर करत मिठीतील कचरा, प्लास्टिक काढण्यात येणार आहे. यासाठी आज एमएमआरडीए आणि 5 अर्थ, एनजीओ यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तर यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिठीची पाहणीही केली.

Aaditya Thackeray
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबईत एक नदी आहे जिचे नाव मिठी आहे, हे अनेक मुंबईकरांना 26 जुलैच्या पुरावेळी समजले. यानंतर 26 जुलैच्या प्रलयाला कारणीभूत ठरलेल्या आणि दुर्लक्षामुळे नाला झालेल्या या मिठीला 'मिठी' करण्यासाठी एमएमआरडीए आणि पालिकेने कंबर कसली. कोट्यवधीचा खर्च केला. पण अद्याप मिठी काही मिठी होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एमएमआरडीएने आपला मोर्चा मिठीकडे वळवला आहे. त्यानुसार आता या नदीचे पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. बायोमेडीएशन आणि फायटोरोमेडीएशन पद्धतीचा वापर करत नदीतील कचरा तसेच प्लॅस्टिक काढण्यात येणार आहे. सोल्युशन कॉन्सट्रेशन मॉड्युल्स या तंत्रज्ञानाचा वापर करत पाण्यातील कचरा, प्लॅस्टिक जमा केले जाणार आहे.
Aaditya Thackeray
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी करारावर केल्या स्वाक्षऱ्या

हेही वाचा - ...अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मिठीतून काढण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करत त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. 18 महिन्यांसाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून यासाठी अर्थसहाय्य एमएमआरडीए करणार आहे. तर प्रकल्पाच्या कामावर लक्ष ही ठेवणार आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत मिठी स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती ही केली जाणार आहे.

Aaditya Thackeray
मिठीची पाहणी करताना आदित्य ठाकरे

हेही वाचा - 'आदित्य ठाकरे यांची देखील ड्रग्ज टेस्ट करा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.