मुंबई - ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दुबईतील एका प्रोफेसरला मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या प्रोफेसरला अटक केली आहे. त्याच्याकडून 'एमडीएमए एक्सटेसी पिल्स' नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. डुबा ओलिवर असे या अमली पदार्थ तस्कराचे नाव आहे.
उपचारासाठी आला होता भारतात
दरम्यान हा प्रोफेसर दुबईचा असून, त्याला 'हेपेटाइटिस बी'चा आजार होता, त्यावरील उपचारासाठी तो भारतामध्ये आला होता. उपचारादरम्यान त्याला अमली पदार्थांचे व्यसन लागल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीने त्याच्याकडून अमली पदार्थ जप्त केले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - 'नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी'