मुंबई - 14 मार्चला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा कोणत्याही पूर्व सूचना न देता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांवर अनिश्चितेच सावट तयार होण्याची शक्यता आहे. आधीच दोन वेळा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला माझी विनंती आहे की त्यांनी परीक्षा ठरलेल्या तारखेला घ्यावी अशी विनंती राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यसरकारला केली आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत असतात. मात्र, जर परीक्षा अशाप्रकारे पुढे ढकलण्यात आल्या तर पालक तसेच विद्यार्थी त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभा राहतो. अश्या सूचना ही पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या आहेत.
सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे. मात्र या संकटात आपण युपीएससीची आणि आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या, अधिवेशनही झाले असताना मग एमपीएससीची परीक्षा ही घेण्यात याव्यात असे ही ते म्हणाले. हे सर्व एमपीएससीचे विद्यार्थी भावि प्रशासक आहेत, त्यामुळे त्यांना जबाबदारी कळते, राज्य सरकारने या परीक्षा ठरलेल्या वेळेत घ्याव्यात अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.