ETV Bharat / city

पंतप्रधान मोदींचे मराठीत ट्विट; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीचे दिले आश्वासन

author img

By

Published : Oct 17, 2020, 1:38 AM IST

राज्यात अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना आणि नदीकाठी असलेल्या गावांना आणि वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीत राज्याला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे.

संपादित
संपादित

मुंबई - महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करून दिली आहे. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांना दिल्याचेही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याला अतिवृष्टीचा जबरदस्त तडाखा बसला आहे. नैसर्गिक आपत्तीचा महाराष्ट्राला फटका बसला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे सूचित केले आहे. कर्नाटकलाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतेच कन्नडमध्ये ट्विट करत कर्नाटक सरकारला केंद्राकडून सहकार्य केले जाईल, असे म्हटले होते.

  • महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं.@OfficeofUT

    — Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात अतिवृष्टीचा कहर

  • सोलापूर जिल्ह्यात पावसाने भीषण अशी परिस्थिती निर्माण केली आहे. पावसाने केलेल्या हाहाकारात मंगळवारपासून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जनावरे दगावले आहेत. या महापुरात जिल्ह्यातील 570 गावे उद्धवस्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नुकतेच दिली आहे.
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा येथे पावसाने कहर केला असून या शिवारातील जवळपास दोनशे एकर शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे या शिवाराला दलदलीचे स्वरूप आले आहे.
  • अवकाळी पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
  • अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह 4 हजार कुटुंबातील 16 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.