मुंबई - आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची अधोगती सुरु झाली आहे. त्यातच आता एनडीए राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदारांकडून होत आहे. त्यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांचं ऐकावं अन्यथा त्यांना अजून एक मोठा झटका भेटेल, असेही त्यांनी म्हटलं. ते 'ईटिव्ही भारत'शी बोलत ( girish maharaj on uddhav thackeray ) होते.
गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांच ऐकावं अन्यथा त्यांना अजून एक मोठा झटका भेटेल. या मुद्द्यावरून शिवसेनेचे १३ खासदार बंड पुकारू शकतात. तसेच, शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीच्या निर्णयाचं स्वागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेसमोर नेमका पेच काय? - भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. सर्वात आधी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना गळ घालण्यात आली होती, पण शरद पवार यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्लीत दोन-तीन हाय व्होल्टेज बैठका पार पडल्या आणि यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र दुसरीकडे आता खासदारांचा पाठिंबा ही शिंदे गटाला वाढू लागला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात काही वेगळा निर्णय घेणार का? याकडेही सर्वांचे लक्ष आहे. तसेच येत्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांचं मतदान नेमक कोणाला होतं? हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - Shivsena : शिवसेनेची 'धनुष्यबाणा'बाबत निवडणूक आयोगाकडे धाव; 'आमची बाजू ऐकून घ्यावी, मगच...'