ETV Bharat / city

वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू, ईटीव्ही भारत'कडून परिस्थितीचा आढावा

मुलुंड परिसरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. महानगरपालिकेचे डॉक्टर जागेवर उपलब्ध नसल्याने एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपले प्राण गमवावे लागल आहे. निशा कसबे असं या महिलेचं नाव आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे.

वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यू

author img

By

Published : Sep 29, 2021, 8:44 AM IST

मुंबई - मुंबईतील मुलुंड परिसरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. महानगरपालिकेचे डॉक्टर जागेवर उपलब्ध नसल्याने एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपले प्राण गमवावे लागल आहे. निशा कसबे असं या महिलेचं नाव आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे.
ही घटना मुलुंडच्या पाच रस्ता परिसरात असलेल्या पालिका रुग्णालयलायत घडली आहे.

वेळेत उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू, ईटीव्ही भारत'कडून आढावा

पालिका अधिकाऱ्यांचा भेट देण्यास नकार

आठ महिन्याच्या गरोदर महिलेला येथील पालिकेच्या रुग्णालयात काल दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र, काल मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली. मात्र, तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. याबाबत उशिरा नातेवाईकांना माहिती मिळाली. त्यानंतर महिलेला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रसूतिगृहमध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे निशा आणि तिच्या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. दरम्यान, यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेट देण्यास नकार दिला.

पालिका अधिकारी सुरेश काकानी यांना पत्र लिहिणार

महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात फक्त चार वाजेपर्यंत डॉक्टर असतात. त्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत एकही डॉक्टर नसतात. तातडीने डॉक्टरची गरज भासल्यास येथील सावरकर रुग्णालयात रुग्णाला पाठवण्यात येते. मात्र, इथेही तीच परिस्थिती आहे. एकीकडे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी हजारो कोटीचा खर्च करण्यात आला. मात्र, पालिकेच्या रुग्णालयाला द्यायला तुमच्याकडे डॉक्टर नाहीत. पालिका अधिकारी सुरेश काकानी यांना पत्र लिहिणार आहे. या पत्रात या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे. तसेच, मुलुंड पोलीस ठाण्याला देखील पत्र लिहिणार आहे. त्यांनाही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, असे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा - गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला नसल्याचे मुंबई पालिकेचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.