मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खासगी रुग्णालयात गरोदर स्त्रियांच नाव नोंदवूनही दाखल करण्यास नकार दिला जातो. असाच प्रत्यय एका मुस्लिम दांपत्याला आला. अखेर या दांपत्यासाठी शिवसेना मदतीला धावून आली. वेळीच त्या महिलेला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे शनिवारी बकरी ईदच्या दिनी त्यांना कन्यारत्न जन्माला आले. याप्रकरणी नवजात मुलीचे पिता पठाण यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका खासगी रुग्णालयात जावेद पठाण या होमगार्डने आपल्या पत्नीच नाव नोंदवले होते. मात्र रुग्णालयात नोंदवूनही त्याच्या पत्नीला रुग्णालयाने प्रसुतीसाठी दाखल करण्यास नकार दला. अखेर पठाण यांनी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानवळे यांना माहिती दिली. जानवळे यांच्या मदतीने कूपर रुग्णालयाच्या प्रसुतीगृहात दाखल करून घेण्यात आलं. या गरोदर मातेला रक्ताची गरज असताना शिवसेनेच्या मदतीमुळे रक्तही देण्यात आलं. शिवसेनेच्या मदतीमुळे त्याची पत्नी आणि मुलगी वाचली आहे. त्यामुळे जावेद पठाण या होमगार्डने शिवसेनेबाबत कृतज्ञता व्यक्त केलीय.
ईद निमित्त मुस्लिम कुटुंबियाला शिवसेनेच्या मदतीमुळे कन्यारत्नाचा लाभ झाला आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले.
ही कोरोना लढ्यातील शिवसेनेच्या कामाची पोचपावती असल्याची भावना शिवसेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जावळे यांनी व्यक्त केलीय