मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या किनारी भागात पावसाची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या इशाऱ्यानुसार मुंबईच्या अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी पाच ते दहा मिनिटे हलक्या सरी बसरल्या. त्यामुळे वातावरणात थंडावा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई, पश्चिम आणि पूर्व उपनगर या परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अरबी समुद्राच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी, किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे.