मुंबई - मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली ( Sambhajiraje Strike On Maratha Reservation ) आहे. त्यापार्श्वभुमीवर विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी 3 मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाची पुन्हा एकदा वाचा ( Pravin Darekar On Maratha Reservation ) फोडू, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला ( Pravin Darekar Warn Mahavikas Aghadi ) आहे.
प्रसारमाध्यमांना बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेहमीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रत्येक बाबींवर लक्ष दिले. अगदी छोट्या छोट्या संघटनांना देखील नेहमी ऐकून घेतले. मात्र, मराठा समाजाची घोर निराशा राज्य सरकारने केली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ, सारथी संस्था आणि वसतिगृह सारखे साधे प्रश्न देखील सरकारने मार्गी लावले नाहीत. त्यामुळे 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा वाचा फोडू, असा इशारा दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे. त्यात राजकारण कोणीही आणू नये. यावर आपण ठाम आहे. मात्र, राजकारणाशिवाय कोणताही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्लाही प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar In Pune : अन् अजित पवार संतापले; म्हणाले, मग काय तुरुंगात जाऊ...