मुंबई - महाविकास आघाडी सरकार विविध घोटाळ्यांमध्ये गुंतलेले आहे. तर दुसरीकडे गेल्या अडीच वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता ( Pravin Darekar Slammed Mahavikas Aghadi gov ) बोजवारा उडाला आहे. सरकारला ना जनतेशी, ना शेतकऱ्यांशी ना एसटी कर्मचाऱ्यांशी प्रश्नांसोबत देणेघेणे असल्याची जोरदार टिकेची झोड विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज उठविली. महाविकास आघाडी सरकार म्हणजे ( Mahavikas Aghadi gov ) घोटाळेबाज आणि भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप दरेकरांनी केला.
विधानपरिषदेत विरोधी पक्षांच्या नियम २६० च्या प्रस्तावावर विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर ( Pravin Darekar in assembly session ) यांनी सुमारे दीड तास सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, की राज्याच्या विकासासाठी कायदा व सुव्यवस्था महत्वाचे विषय आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत असल्यास औद्योगिक वातावरणात उत्तम ( Law and order in Maharashtra ) राहते. महाराष्ट्रातील औद्योगिक वातावरण चांगले असेल, माता भगिनींसाठी चांगले वातावरण असेल तर राज्य प्रगती पथावर आहे असे म्हटले जाते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या शासनकाळात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
हेही वाचा-Assembly Election 2022 : काँग्रेसला साथ देणाऱ्या दिगांबर कामतांची ही आहे सहावी निवडणूक
ईडी व केंद्राच्या नावाने बोटे मोडायची- दरेकर
प्रवीण दरेकर म्हणाले, की राज्यात सोपी टूम निघाली आहे. काही झाले की ईडी व केंद्राच्या नावाने बोटे मोडायची. मात्र, वास्तविक पाहता आजपर्यंत जे गुन्हे झाले आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. 1993 साली मुंबईत घडवून आणलेला बॉम्बस्फोट आजही काळजाचा थरकाप उडतो. यामध्ये 357 लोक दगावले आहेत. जवळपास ९०० लोक जखमी झाले. कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, तत्कालीन सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे या गुन्ह्यातील गुन्हेगार दाऊद आणि खासकर मुंबई सोडून पाकिस्तानमध्ये पळाले.
हेही वाचा-Michael Lobo : कमळला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा पकडला 'हात'; पाहा, मायकल लोबोची कारकीर्द
बनावट कागदपत्रे तयार केली तरी साथ द्यायची का?
26 नोव्हेंबर 2008 मध्ये पुन्हा हल्ला करण्यात आला. राष्ट्रीय भावना असणारा व्यक्ती हा काळा दिवस विसरू शकणार नाही. यामागील सूत्रधार कोण हे जगाला माहिती आहे. असे असताना त्यातून काही संबंध प्रस्थापित होत असतील, कोणाला अटक झाली असेल तर महाविकास आघाडी सरकरमधील नेत्यांना काय अडचण आहे, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. सरकार एखादी व्यक्ती मंत्रिमंडळात आहे म्हणून कोणाची बाजू घेताय का? टेरर फंडिंगचा संशय आहे. तरी त्यांना साहाय्य करायचे का? अंडरवर्ल्डच्या मदतीने जमीन बळकावली आहेत. बनावट कागदपत्रे तयार केली तरी साथ द्यायची का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. कारवाई केल्यास केंद्रीय यंत्रणा सूडबुद्धीने वागत असल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकार करत असल्याचे दरेकर म्हणाले.
हेही वाचा-International Flights resume: आंतरराष्ट्रीय उड्डाणे 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार
महात्मा गांधीजींनी अहिंसा शिकविली
देशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्या हस्तकांशी आर्थिक संबंध असणाऱ्या हातमिळवणी करणाऱ्या सरकारमधील एका मंत्र्याच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारने आंदोलन केल्याबद्दल आश्चर्य वाटते. खास करून गृहमंत्री यांच्यासह अर्धे मंत्रीमंडळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला बसले. महात्मा गांधीजींनी अहिंसा शिकविली. असे असताना ज्या बॉम्बस्फोटातील आरोपींमुळे प्राण गमावले. त्यांनी दहशतवाद्यांशी संबंध ठेवले. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना अटक झाली. त्यांच्यासाठी सरकार तारणहार बनत असल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची अशी अधोगती पाहिली नाही, राजकारणात मतभेद असू शकतात. पण जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो, राष्ट्रभक्तीचा व देशभक्तीचा प्रश्न येतो. तेव्हा पक्षाचे लेबल बाजूला ठेवून आपण कोणा व्यक्तीशी पाठराखण करणे योग्य नसल्याची टीका दरेकर यांनी केली.
न्यायालय निष्पक्ष असल्यामुळे कारवाई
माजी गृहमंत्री देशमुख त्यांच्या काळात तत्कालिन पोलीस आयुक्तांनी त्यांची तक्रार केली. त्यांनी गैरमार्गाने नियुक्त झालेल्या सचिन वाझे यांनी ॲन्टेलिया प्रकरण व इत्यादी प्रकरण उघड केले. म्हणून त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. न्यायालय निष्पक्ष असल्यामुळे कारवाई झाली. यात भाजपचा काय संबंध असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचा षड्यंत्र महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सरकारचा कारभार जर लोकाभिमुख कारभार असल्यास केंद्रीय तपास यंत्रणा काही करणार नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला.
अल्पसंख्यांक मंत्र्यांनी किरीट सोमैय्या यांना आयटम गर्ल म्हटले
भारतीय जनता पक्षावर तपास यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप होतो. संजय राठोड गुन्हा दाखल झाला का? मग गैरवापराचा काय संबंध? असा प्रश्न उपस्थित करून दरेकर म्हणाले, ज्या वेळेस केंद्रीय यंत्रणांवर आरोप करताना एक बोट त्यांच्याकडे दाखवताना पोलीस बळाचा वापर करून आपण काय करतोय हे अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. परंतु, अल्पसंख्यांक मंत्र्यांनी किरीट सोमैय्या यांना आयटम गर्ल म्हटले, त्यावर कारवाई का केली नाही? हे वाक्य आक्षेपार्ह नाही का, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला.
राजकीय सुडासाठी पोलिसांचा वापर
राज्यातील महिलांना, केंद्राला व अगदी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देण्याचे धाडस करू शकतो असे बोलण्याचे धाडस महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री करत आहेत. त्यांच्याविरोधात गृहमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून महिलेला मारहाण होते. पण कारवाई होत नाही. शिवसेनेच्या नेत्यावर 24 वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण त्यांच्याविरुध्द कारवाई नाही. राज्यातील गुन्ह्यांची संख्या गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुन्हेगारांना अभय आणि राजकीय सुडासाठी पोलिसांचा वापर महाविकास आघाडी सरकार बदल्यांमध्ये गुरफटलेले असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.