ETV Bharat / city

जम्बो कोविड सेंटर म्हणजे मुंबईकरांच्या पैशांची लुटमार - प्रविण दरेकर - प्रविण दरेकरांची कोवीड सेंटरवर प्रतिक्रिया

कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णामागे आकारण्यात येणाऱ्या बिलापेक्षा जम्बो कोविड सेंटरमध्ये आकारण्यात येणार बिल जास्त आहे. तसेच या सेंटरमध्ये पुरेसे रुग्ण नसताना देखील पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. असा आरोप विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर
author img

By

Published : Aug 9, 2020, 2:51 PM IST

मुंबई - 'मुंबईकरांच्या घामाच्या पैशाची कशा पद्धतीने लुटमार केली जाते, याचे उदाहरण म्हणजे जम्बो कोविड सेंटर आहेत'. असा आरोप विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. मुलुंड येथील रिचर्ड अँड क्रूडस सन्समधील जम्बो कोविड केअर सेंटरच्या पाहणी दरम्यान ते बोलत होते.

मुलुंडमध्ये याआधीच मिठागर येथील पालिका शाळेत तसेच जकात नाक्याजवळ असलेल्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु या दोन्ही सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णामागे आकारण्यात येणाऱ्या बिलापेक्षा जम्बो कोविड सेंटरमध्ये आकारण्यात येणार बिल जास्त आहे. तसेच या सेंटरमध्ये पुरेसे रुग्ण नसताना देखील पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. असा आरोप विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. आज दरेकर यांनी मुलुंड येथील रिचर्ड अँड क्रूडस सन्समधील जम्बो कोविड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

मुंबईकरांच्या घामाच्या पैशाची कशा पद्धतीने लुटमार केली जाते, याचं उदाहरण म्हणजे जम्बो कोविड सेंटर्स आहेत. महापालिकेने थेट आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता खाजगी एजन्सी नेमण्याचं कारण काय? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोविडच्या संकटाचा फायदा घेत महानगर पालिकेने नागरिकांच्या पैशाचा अपव्यय केला. तर भारतीय जनता पार्टी गांभीर्याने या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करून लोकांसमोर सत्य उघडकीस केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील प्रविण दरेकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा आणि भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा - '१० लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, पदवी परीक्षेबाबतचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्या'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.